जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चहाचे 'हे' प्रकार ठेवू शकतात तुम्हाला तरुण; जाणून घ्या सविस्तर माहिती

चहाचे 'हे' प्रकार ठेवू शकतात तुम्हाला तरुण; जाणून घ्या सविस्तर माहिती

चहाचे  प्रकार

चहाचे प्रकार

आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला चहा आपल्या त्वचेलाही टवटवीत ठेवण्यास मदत करतो, असं तुम्हाला सांगितलं तर? चहाचे अनेक प्रकार आपल्या चेहऱ्यावरील स्ट्रेस लाइन्स प्रभावीपणे कमी करतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 04 एप्रिल: आपल्या देशामध्ये चहा हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये नियमितपणे चहा प्यायला जातो. चहा सोबत कितीतरी लोकांच्या खास आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. चहाचा एक लहानसा कप कित्येकांच्या लव्ह स्टोरीचा, मित्रांच्या गप्पांच्या मैफिलीचा साक्षीदार ठरला आहे. अगदी लग्नासाठी मुलगी बघायला आल्यानंतरही तिला चहा बनवता येतो का? हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. या शिवाय, डोकेदुखी असो, घसा खवखवत असो किंवा सर्दी झालेली असो झटपट आराम मिळवण्यासाठी एक कप आल्याचा चहा प्यायला प्राध्यान्य दिलं जातं. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला चहा आपल्या त्वचेलाही टवटवीत ठेवण्यास मदत करतो, असं तुम्हाला सांगितलं तर? चहाचे अनेक प्रकार आपल्या चेहऱ्यावरील स्ट्रेस लाइन्स प्रभावीपणे कमी करतात. ‘मिड डे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वाढत्या पर्यावरणीय प्रदूषणामुळे आपण फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससाठी संवेदनाक्षम बनतो. आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, निस्तेजपणाच्या रूपात हे बदल दिसून येतात. चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी एजिंग गुणधर्म असल्यानं, एक किंवा दोन कप चहा तुमच्या त्वचेला टवटवीत करू शकतो. चेरीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ परिमल शाह यांनी चहाच्या विविध प्रकारांची आपल्या स्किनकेअरमधील भूमिका स्पष्ट केली आहे. Panipuri Health Benefits : आठवड्यात 2 वेळेस खा पाणीपुरी, शरीरात होतील वेगळेच बदल; कळताच हैराण व्हाल! ब्लॅक टी पॉलिफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं उच्च प्रमाणात असलेला ब्लॅक टी अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर प्रकारच्या चहाशी तुलना केल्यास आणि असंख्य रिसर्चचा अभ्यास केल्यास हे लक्षात येतं की, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ब्लॅक टी लक्षणीयरित्या प्रभावी आहे. ब्लॅक टीमधील त्वचा साफ करणारे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील डागांना कारणीभूत असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. ग्रीन टी ग्रीन टीमध्ये अँटी-इन्फ्लामेट्री गुणधर्म असतात. ग्रीन टी कोरड्या त्वचेला मॉइश्चराइझ करतो, हायड्रेट करतो आणि सनबर्नचे परिणाम कमी करतो. याशिवाय, त्वचेची जळजळ, लालसरपणा, ब्रेकआउट आणि सूज कमी करण्यात देखील हा चहा मदत करतो. ग्रीन टीचे अनेक फायदे असल्यामुळे अनेक त्वचा तज्ज्ञ देखील तो चेहऱ्याला लावण्याचा सल्ला देतात. तसेच ग्रीन टीमुळे किरकोळ जखमांवर उपचार करण्यात मदत होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांमध्ये ग्रीन टी विशेष लोकप्रिय आहे. ग्रीन टी आणि लेमनग्रास (गवतीचहा) हे त्वचेसाठी एक आदर्श संयोजन आहे. लेमनग्रास बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. आमला हर्बल टी चहातील आवळ्याचा अर्क तुमच्या त्वचेसाठी चमत्कारीक ठरू शकतो. आवळ्याचा रस व्हिटॅमिन सीची पातळी वाढवतो. नियमितपणे आवळ्याचा चहा प्यायल्यास त्वचेच्या कोलेजन निर्मितीला चालना मिळते आणि त्वचा मऊ व तरुण दिसते. आवळ्यापासून बनवलेल्या चहामुळे त्वचेवरील मुरुमांचे डाग, बारीक रेषा आणि ब्रेकआउट कमी होतात. तुम्हालाही मोमोज आवडतात? वेळीच व्हा सावध, शरीरावर होतात भयंकर परिणाम! लॅव्हेंडर टी लॅव्हेंडर टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या एपिडर्मिसच्या (बाह्यत्वचा) डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. याव्यतिरिक्त, ते सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणोत्सर्गामुळे त्वचेवर पडणाऱ्या डागांपासूनदेखील तुमच्या त्वचेचं संरक्षण करतात. लॅव्हेंडर टी त्वचेसाठी थंड आणि शांत असतो. हा चहा प्यायल्यास त्वचेचा विविध रोगांपासून बचाव होतो. जिंजर-टर्मरिक टी जेव्हा आपण आल्याचा विचार करतो तेव्हा त्याचा तीव्र आणि मसालेदार सुगंध आपल्या डोक्यात येतो. नैसर्गिक आल्याचं तेल किंवा जिंजरॉल हे जळजळ आणि वेदना कमी करण्यात मदत करतं. जिंजेरॉलचे दाहक-विरोधी गुण त्वचेची सूज कमी करण्यास मदत करतात. हळदीतील कर्क्युमिन हा सक्रिय घटक आणि आलं हे असे पदार्थ आहेत जे त्वचेची हिलिंग कॅपॅसिटी वाढवतात. त्यामुळं आलं आणि हळदीचा चहा तुमच्या एपिडर्मिससाठी फायद्याचा आहे. वेलचीचा चहा वेलचीच्या चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. त्यामुळे त्वचेवरील ब्रेकआउट सुधारण्यात मदत होती. वेलची हा नैसर्गिकपणे त्वचा शुद्ध करणारा पदार्थ आहे. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि तुमचा चेहरा अधिक नितळ दिसतो. वेलचीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मँगनीजसह अँटी-एजिंग गुणधर्म देखील असतात. चहाचे हे प्रकार अनेक आरोग्यदायी फायदे देण्याव्यतिरिक्त आपली कांती देखील उजळवतात. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की, कोणत्याही प्रकारचा चहा फार कमी वेळात बनतो. त्यामुळे तुमच्या सेल्फ-केअर रूटीनमध्ये चहाचा समावेश केला पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात