मुंबई, 4 एप्रिल : मोमो हा पदार्थ चीनमधून आला असला तरी भारतातही बराच लोकप्रिय झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये इंडियन स्टाइल मोमोजही मिळतात. मोमोजच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. पण हे चविष्ट मोमोज खाण्याचे दुष्परिणामही बरेच आहेत. तुम्हीही मोमोज खात असाल तर सावध होण्याची गरज आहे. मोमोज खाल्ल्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. स्टार्चचा वापर मोमोजच्या पीठात स्टार्चचा वापर केला जातो. यामुळे कोलेस्टेरॉल व रक्तातील ट्रायग्लिसराईड वाढते. मोमोजबरोबर मिळणारी चटाकदार चटणी जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुळव्याध होऊ शकते. मोमोजमध्ये वापरल्या जाणाऱ्या एझोडायकार्बोनामाइड व बेजॉयल पॅरोक्साइड या घटकांमुळे शरीरातील इन्शुलिन हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं. मोमोजचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते. मोमोंमध्ये मोनो सोडियम ग्लूटामेट असतं, त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. जास्त मोमो खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. मोमो मैद्यापासून तयार होतात, त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. मैदाचा वापर मोमो तयार करण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. मैदा तयार करण्यसाठी गव्हातील हाय फायबरयुक्त भाग वेगळा केला जातो. नंतर याला अॅझोडीकार्बोनामाइड, क्लोरीनॅगस, बेंझॉइल पेरोक्साइड किंवा अन्य रसायनांच्या माध्यमातून ब्लीच केलं जातं. या केमिकल्समधील अनेक घातक तत्त्व जी मैद्याला मुलायम आणि क्लीन टेक्स्चर देण्याचं काम करतात ती यात असतात. केमिकल्समुळे पॅनक्रियाजद्वारे इन्शुलिन प्रॉडक्टिविटीवर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच ही केमिक्लस इन्शुलिन डिपेंडंट डायबेटिसचं कारण देखील ठरतात. मोमो श्वासनलिकेत अडकल्याने मृत्यू दरम्यान, मोमो खाल्ल्याने जीव गेल्याचीही एक घटना समोर आली होती. दिल्लीमध्ये मोमो खाल्ल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मोमो खाताना तो श्वासनलिकेत अडकल्याने श्वास गुदमरला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर, दुसऱ्या एका घटनेत खूप तिखट मोमो खाल्ल्याने एका व्यक्तीच्या पोटात अॅसिड प्रचंड वाढलं आणि त्यामुळे त्याला पोटात स्फोट झाल्याचा भास झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या. मात्र जेव्हा टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा पोटाची स्थिती पाहून सर्वच घाबरले. या व्यक्तीने मसालेदार मोमोज आणि त्यानंतर तिखट सूपही प्यायलं होतं. यामुळे त्याच्या पोटात गॅस तयार झाला, मात्र अन्न आतड्यांमधे अडकल्यामुळे गॅस बाहेर जाऊ शकला नाही आणि पोटात स्फोट झाला होता. डॉक्टरांनी प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.