मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 20 जुलै : पावसाळ्यात म्हणजेच श्रावणात अळूच्या भाजीला मोठी मागणी असते. अळू हे थंड आणि पोटाचे आजार दूर करणारं असतं, तसेच अळूची भाजी रक्तवर्धक असते. आज आपण तिचे असे अनेक आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. बाळंतिणीला दूध येण्यासाठी तिने दररोज अळू आणि मेथी यांची मिश्र भाजी खावी. त्यामुळे भरपूर आणि सकस दूधवृद्धी होते. पर्यायाने बाळाची वाढही सुदृढ होते. त्याचबरोबर कधी विषारी किटक चावल्यास अळू फुफाट्यात भाजून त्याचा रस प्यावा आणि दंशस्थानी लावावा. असं केल्यास आराम मिळतो. अनेक राज्यांमध्ये या भाजीची पानं केवळ एका रुपयाला मिळतात. शिवाय ही भाजी खाल्ल्याने वजनही आटोक्यात येतं.
पावसाळ्यात झाडांवर अळू वर्गातील वाताळू ही अळूसारखी पानं असलेली वनस्पती उगवते. अळूसारखी भाजी किंवा अळूवड्या करण्यासाठी या पानांचा उपयोग करण्यात येतो. हे अळू वातनाशक असतं म्हणून त्याला वाताळू म्हणतात. शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवाला आला नाही, शेतकऱ्याने असा जुगाड केला की सगळे पाहतच राहिले! प्रामुख्याने गोव्यात काळे अळू, पांढरे अळू, तिरूपतीचे अळू, कासाळी अळू असे या भाजीचे वेगवेगळे प्रकार आढळतात. त्यापैकी कासाळी अळूच्या पानांची भाजी सहसा खात नाहीत. परंतु चतुर्थीला गौरी पूजनासाठी ही पानं वापरली जातात.