जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दररोज तीच Coffee पिऊन कंटाळलात; फक्त मिसळा हे 2 पदार्थ, चवीसह फायदेही होतील डबल

दररोज तीच Coffee पिऊन कंटाळलात; फक्त मिसळा हे 2 पदार्थ, चवीसह फायदेही होतील डबल

दररोज तीच Coffee पिऊन कंटाळलात; फक्त मिसळा हे 2 पदार्थ, चवीसह फायदेही होतील डबल

कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कॉफीचा हाच फायदा तुम्हाला द्विगुणित करता येईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : अनेकांना सकाळची सुरुवात कॉफी ने करायला आवडते. कित्येकांची संध्याकाळ तर कॉफीशिवाय पुढे जातच नाही. कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. बरेच लोक ऊर्जा मिळण्यासाठी म्हणून कॉफी पितात. पण कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आता यावर काय उपाय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वातावरणात असलेले अनेक प्रकारचे बॅक्टेरिया शरीराचे नुकसान करतात, ज्यामुळे प्रोटीन आणि डीएनए खराब होऊ शकतात. हेल्थलाइनच्या मते, या बॅक्टेरियाशी लढण्याचे काम कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट्स करू शकतात. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्व, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि कर्करोगाचा धोका कमी करू शकतात. कॉफीमध्ये हायड्रोसिनॅमिक अॅसिड आणि पॉलीफेनॉलसह अँटिऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. तुम्ही देखील चहासोबत ब्रेड खाता का? मग सावधान! यामुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान 24 तासांत 4 ते 5 कप कॉफी प्यायल्यास शरीर दिवसभर ऊर्जावान ठेवता येते. पण कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याला पर्याय म्हणजे तुम्ही कॉफीमध्ये इतर अँटिऑक्सिडंट मिसळून कॉफीची ऊर्जेची क्षमता वाढवू शकता. म्हणजे मोजक्या कप कॉफीमधूनच तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

आलं टाकून करा कॉफी आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे कॉफीसोबत घेतल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. आले कॉफीची चव वाढवते तसेच उलट्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देते. आल्यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात. पचनाच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते.

फक्त पाणी पिऊनही High BP नियंत्रित ठेवता येते, ही सोपी पद्धत समजून घ्या

हळद आणि कॉफी हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करतात. हळद आणि कॉफीच्या सेवनाने पचनाची समस्या सुधारते. एक कप कॉफीमध्ये चिमूटभर हळद टाकल्यास ते शरीराला ऊर्जा देण्याचे काम करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात