जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कमी वेळात लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी या पद्धती वापरून पहा

कमी वेळात लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी या पद्धती वापरून पहा

कमी वेळात लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी या पद्धती वापरून पहा

लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे कमीच घालता येतात. त्यामुळे दोन-तीनदा कपडे घालण्याची कसरत करावी लागते. यामुळे आपली मेहनत आणि वेळ दुप्पट जातो. मेहनत आणि वेळ वाचवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जुलै : तंत्रज्ञानाच्या विकासामुळे लोकांची जीवनशैली खूप सोपी झाली आहे. आता लोक रोजची कामे मशिनच्या मदतीने चुटकीसरशी पूर्ण करतात. वॉशिंग मशिनमध्ये (Washing machine) कपडे धुणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. वॉशिंग मशीनमध्ये काही वेळात कपडे स्वच्छ होतात. मात्र, काहींच्या वॉशिंग मशिनचा आकार लहान असल्यामुळे एकाच वेळी वॉशिंग मशिनमध्ये अनेक कपडे धुणे कठीण होते. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून तुम्ही हे अवघड काम सोपे करू (Tips and tricks) शकता. लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे कमीच घालता येतात. त्यामुळे दोन-तीनदा कपडे घालण्याची कसरत करावी लागते. यामुळे आपली मेहनत आणि वेळ दुप्पट जातो. म्हणूनच आम्ही छोट्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचे काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही लहान वॉशिंग मशीनमध्येही सर्व कपडे सहज धुवू शकता. लहान वॉशिंग मशीनमध्ये असे कपडे धुवा - पाण्याच्या पातळीकडे लक्ष द्या - लहान वॉशिंग मशीनमध्ये पाण्याची क्षमता देखील कमी असणार. अशा परिस्थितीत जास्त पाणी भरल्याने सर्व कपडे नीट वॉश होऊ शकत नाहीत. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये दिलेल्या लेव्हलपर्यंत पाणी भरा आणि मशीनमध्ये लेव्हलपेक्षा जास्त पाणी भरणे टाळा. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर जड आणि हलके कपडे - लहान वॉशिंग मशिनमध्ये जास्त जड कपडे धुण्याने मशीनवर जास्त भार तर पडतोच पण कपडे स्वच्छ होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे सर्व जड कपडे एकाचवेळी यंत्रात ठेवू नका आणि हलक्या कपड्यांसोबत 1-2 जड कपडे मिसळत राहा. यामुळे मशीनवर कोणताही भार पडणार नाही आणि वेळही कमी लागेल. डिटर्जंटचा वापर - वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना जास्त डिटर्जंट घालणे टाळा. जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर टाकल्याने मशीनमध्ये वरपर्यंत फोम तयार होतो. यामुळे मशीनच्या वरच्या भागावर डिटर्जंट जमा होण्याबरोबरच त्याचा परिणाम यंत्राच्या कार्यक्षमतेवरही होतो. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा या गोष्टींची विशेष काळजी घ्या वॉशिंग मशीनच्या चांगल्या कार्यासाठी, खिसे तपासल्यानंतरच कपडे मशीनमध्ये घाला. कपड्यांमध्ये प्लास्टिक, टिश्यू, नाणी आणि चाव्या अजिबात राहू नयेत हे लक्षात ठेवा. तसेच, ओले कपडे जास्त वेळ मशीनमध्ये ठेवणे टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lifestyle
  • First Published :
जाहिरात
जाहिरात