मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Climate change मुळे गंगा नदीच्या प्रवाहात बदल! पुराचा धोका वाढला!

Climate change मुळे गंगा नदीच्या प्रवाहात बदल! पुराचा धोका वाढला!

गंगा (Ganga) खोऱ्यातील नद्यांचे प्रवाह बदलत असल्याने वारंवार पुराचा (Floods) धोका निर्माण झाला आहे. या भागातील नद्यांवर केलेल्या अभ्यासातून हा अंदाज समोर आला आहे. या अभ्यासात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, याचे मुख्य कारण हवामान बदल (Climate Change) तसेच नद्यांवर अलीकडेच बांधण्यात आलेली धरणे यांसारख्या मानवी हस्तक्षेप आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 19 नोव्हेंबर : हवामान बदलाचा (Climate Change) परिणाम जगातील ऋतू आणि जंगलांवरच नाही तर नद्यांवरही होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) जगभरातील जीवजंतू नवीन परिस्थितींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, नद्यांना वारंवार पूर येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय अभ्यासातून असे सूचित करण्यात आले आहे की, गंगा नदीच्या (Ganga River) मैदानात वाहणाऱ्या नद्यांना आता आणखी पूर आलेला पहायला मिळेल. कारण मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे त्यांचा प्रवाह बदलत आहे.

IISc बंगळुरू आणि IIT कानपूरचे संशोधन

हा नवीन अभ्यास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरच्या संशोधकांनी केला आहे. मानवी हस्तक्षेपाचा नद्यांवर गंभीर प्रदुषणापासून ते त्यांच्या प्रवाहावर अत्यंत घातक परिणाम झाल्याचे यातून समोर आले आहे. हा अभ्यास सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

हवामान आणि मानवी हस्तक्षेप

हवामान बदल आणि धरणे बांधण्याच्या मानवी हस्तक्षेपांचा या प्रदेशावर कसा परिणाम होत आहे, हे अभ्यासात विशेषत: तपासले गेले आहे. यामध्ये पूर्वी डोंगराळ भागातील मानवी हस्तक्षेपांचे विश्लेषण करण्यात आले, ज्यात भागीरथी आणि अलकनंदा यांसारख्या उपनद्यांवर विशेष लक्ष देण्यात आले होते.

गंगा नदीच्या पाण्यात कोरोना नाही; मात्र आढळले 'हे' हानिकारक विषाणू

कोणत्या क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला?

पश्चिमेकडील सहायक नदी भागीरथी गंगोत्री हिमनदीतून उगम पावते, तर पूर्वेकडील उपनदी अलकनंदा ही सतोपंथ हिमनदीतून उगम पावते. देवप्रयाग येथे दोन्ही नद्या गंगेला मिळतात. संशोधकांनी गंगेच्या खोऱ्याचा वरचा भाग ऋषिकेशपर्यंत केला. भागीरथी क्षेत्रातील चार बंधारे 2010 पासून कार्यरत आहेत. तर दोन अलकनंदा खोऱ्यात 2015 पासून कार्यरत आहेत.

वारंवार पूर येणार

अलकनंदा खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह 1995 ते 2005 पर्यंत दुप्पट झाला आहे. याचे कारण म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दरात वाढ, ज्याला अतिप्रवाह किंवा Extreme flow देखील म्हणतात. संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की हा अतिप्रवाहाचा वेग वाढेल आणि गंगेच्या खोऱ्यात वारंवार पूर येतील.

गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता रडण्याचा आवाज; उघडून बघताच सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

उच्च प्रवाह का?

या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि IISc मधील इंटरडिसिप्लिनरी सेंटर ऑफ वॉटरमधील रिसर्च फेलो सोमिल वर्णाकर यांनी इंडिया टुडेच्या रिपोर्टला सांगितले की, “आम्हाला आढळले की अलकनंदा खोऱ्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे, जे भागीरथी खोऱ्यात नाही. अलकनंदाच्या पुढील खालच्या भागात असे ट्रेंड अधिक दिसले आहेत. म्हणूनच आम्ही या भागातही अतिप्रवाहाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहिले आहे."

नद्यांच्या दिशेवर परिणाम

संशोधकांनी पुढे असे सुचवले आहे की अलकनंदा प्रदेशात धरणे बांधणे आणि हवामान बदलाच्या परिणामामुळे नद्यांच्या प्रवाहांमध्ये बदल होऊ लागला आहे. धरणे आणि जलाशयांनीही या नद्यांनी आणलेल्या गाळाची दिशा बदलली आहे, गंगेच्या मैदानात गाळ नसल्यामुळे नद्यांचे स्वरूप बदलले आहे.

भारतातील हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हिमालयीन प्रदेशांना बसला आहे. त्याचवेळी, स्वच्छ पाण्याच्या या स्त्रोतांमध्ये धरणे आणि जलाशयांमध्ये वाढ झाल्यामुळे, हिमालयीन नदी खोऱ्यातील पर्यावरणीय प्रक्रियांवर वाईट परिणाम झाला आहे. गंगा खोऱ्याच्या वरच्या भागात टिहरी धरणाची भूमिका महत्त्वाची असल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे. मोठ्या जलाशयामुळे आणि प्रवाह नियंत्रण संरचनेमुळे, ते वरून येणारे गाळ अडकवते आणि नदीच्या पुढील भागात प्रवाह नियंत्रित करते. मात्र हा प्रवाह नियंत्रित करून नद्यांची दिशाही नवीन तंत्राने नियंत्रित करता येते.

First published:

Tags: Ganga river, Rain flood, Uttarakhand floods