बीजिंग, 20 सप्टेंबर : एखाद्या घरात चिमुकला पाहुणा (Baby born) आल्यानंतर त्या कपलसोबत त्यांच्या कुटुंबालाही आनंद होतो. त्यात जुळी (Twins) झाली तर मग या आनंदाला पारावर उरत नाही. मुलं जुळी असली तरी त्यांचे वडील मात्र एकच असतात. पण चीनमध्ये (China) एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये जुळ्या मुलांचे बाप मात्र वेगवेगळे निघाले (Twin baby different father) . चीनमध्ये एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. तिच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण होतं. पण जेव्हा बाळांची डीएनए टेस्ट झाली, तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण जुळ्या मुलांचे बाप वेगवेगळे होते. मुलांच्या बर्थ सर्टफिकेटसाठी त्यांची डीएनए टेस्ट करण्यात आली.डिएन टेस्टचा रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले. कारण जुळ्या मुलांचे एक नव्हे तर दोन-दोन बाप होते. एकत्र जन्माला आलेल्या या मुलांचे वडील मात्र वेगवेगळे होते. हे वाचा - गर्भनिरोधक गोळ्या-नसबंदीनंतरही महिला पुन्हा पुन्हा होते प्रेग्नंट; डॉक्टरही शॉक या मुलांची टेस्ट करणारे डॉ. डेंग यजूं यांनी सांगितलं, असं प्रकरण खूप दुर्मिळ असतं. एक कोटीमध्ये फक्त एकच प्रकरण असं असतं. जेव्हा महिलेने एका महिन्यात दोन वेळा ओव्ह्युलशन होतं आणि त्यानंतर कमी कमी वेळेत ते दोघांसोबत संबंध ठेवते तेव्हा अशा परिस्थितीत ती जुळ्यांना जन्म देते पण त्यांचे वडील वेगवेगळे असू शकतात. घरात चिमुकले पाहुणे आल्याचा आनंद साजरा केला जात असताना या डीएनए रिपोर्टमुळे आनंदावर विरजण प़डलं. कारण महिलेच्या अनैतिक संबंधांची पोलखोल झाली होती. महिलेचे दुसऱ्या कुणासोबत संबंध आहेत, याबाबत नवऱ्याला काहीच माहिती नव्हतं. महिलेने आपल्या नवऱ्यासोबत विश्वासघात केला होता. त्यामुळे डीएनए रिपोर्टनंतर तो शॉक झाला. हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, पाहा PHOTOs झी न्यूजच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण तसं जुनं आहे. पण चीनमधील लोकसंख्या नियंत्रण योजनेवरील चर्चेत हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.