Home /News /lifestyle /

अवैध लशीचा भयंकर दुष्परिणाम! कोरोनानंतर आणखी एका आजाराचं संकट

अवैध लशीचा भयंकर दुष्परिणाम! कोरोनानंतर आणखी एका आजाराचं संकट

कोरोनाव्हायरसनंतर (coronavirus) स्वाइन फिव्हरचे (swine fever) दोन नवे स्ट्रेन आढळून आले आहेत.

    बीजिंग, 22 जानेवारी : ज्या चीनमध्ये (China) कोरोनाव्हायरसचा (coroavirus) उद्रेक झाला. त्या चीनमध्ये आता आणखी एका नव्या आजारानं थैमान घातलं आहे. देशात आफ्रिकन स्वाइन फिव्हर (african swine fever) पसरला आहे. स्वाइन फिव्हर (swine fever) व्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेननं डोकं वर काढलं आहे. सध्या तरी हा आजार माणसांमध्ये नाही तर डुकरांमध्ये (pig) पसरला आहे आणि यासाठी विना परवाना लस कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आहे. चीनमधील सर्वात प्रसिद्ध पोर्क विक्रेता कंपनी न्यू होप लिऊहीमधील  1000 डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरचे दोन नवे स्ट्रेन मिळाले आहेत. कंपनीनंच याबाबत माहिती दिली आहे. कंपनीचे चीफ सायन्स ऑफिसर यान झिचुन यांनी सांगितलं की, या संक्रमणामुळे डुक्कर विचित्र पद्धतीने जाड होत आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार यान झिचुन यांनी सांगितलं, "2018-2019 मध्ये चीनमध्ये जो फिव्हर पसरला होता तसा हा फिव्हर नाही. या दोन्ही स्ट्रेनमुळे डुकरांचा मृत्यू होत नाही. पण यामुळे एक विचित्र अशी गंभीर समस्या निर्माण होत आहे, ज्यामुळे हेल्दी डुक्कर जन्मण्याचं प्रमाण कमी झालं आहे. विना परवाना लस डुकरांना दिल्यानं हा आजार झाल्याचं सांगितलं जातं आहे." कोरोना काळात चीनमध्ये आहाराबाबत कठोर नियम आहेत. डुकरांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिलं जातं आहे. पण हा फिव्हर त्यांच्यामध्ये कसा पसरला माहिती नाही. ही चिंताजनक परिस्थिती आहे, असं यान म्हणाले. हे वाचा - मास्क न घालणं चांगलंच महागात! शिक्षा भोगता भोगता नागरिकांना फुटला घाम बीजिंगमधील जीवशास्त्र तज्ज्ञ वाएन जॉनसन यांनी सांगितलं की, "गेल्या वर्षी डुकरांमध्ये असा गंभीर पण जास्त जीवघेणा नसलेला आजारा पाहायला मिळाला. या व्हायरसमध्ये MGF360 कमी होता. न्यू होपमधील डुकरांमध्ये जो स्ट्रेन सापडला आहे, त्यामध्ये MGF360 आणि CD2v जीन गायब आहेत" काही संशोधनानुसार आफ्रिकन स्वाइन फिव्हरच्या व्हारसमधील MGF360 जीन हटवल्यास प्रतिकारक शक्ती येते. पण हे जीन हटल्यानं पुढे हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आणि जीवघेणा ठरू शकला असता म्हणून तेव्हा या आजारावर लस तयार करण्यात आली नाही. हे वाचा - धक्कादायक! सॅनिटायजरचा वापर करत असाल तर सावधान! लहान मुलांना येऊ शकतं अंधत्व नैरोबी इंटरनॅशनल लाइव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिट्युटच्या  (ILRI)  शास्त्रज्ञ लुसिला स्टेना यांनी सांगितलं, "या व्हायरसचं जीनोम सिक्वेंसिंग करून त्यात MGF360 जीन सक्रिय केला तरी त्याचा काही फायदा नाही. कारण जीन आपोआप बाजूला होता. हे म्युटेशन नेमकं कसं होतं आहे हे माहिती नाही"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Virus

    पुढील बातम्या