पेरिस, 22 जानेवारी : कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी जगभरातील लोक अल्कोहॉल आधारित हँड सॅनिटाइजरचा वापर करीत आहेत. फ्रान्समध्ये झालेल्या संशोधनानुसार 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत लहान मुलं जखमी होण्याचं प्रमाण सात पटीने वाढलं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात डोळे खराब होण्याची प्रकरणं आहेत. आता संशोधकांनी इशारा दिला आहे की, चुकूनही सॅनिटाइटर लहान मुलांच्या डोळ्यात गेलं तर त्यांना अंधत्व येऊ शकतं.
फ्रेंच प्वाइजन कंट्रोल सेंटरच्या डेटाबेसनुसार 1 एप्रिल 2020 पासून 24 ऑगस्ट दरम्यान सॅनिटायजरशी संबंधित घटनांची संख्या 232 आहे, जी गेल्या वर्षी 33 इतकी होती. कोरोना व्हायरसच्या बचावासाठी जगभरात सॅनिटायजरच्या वापरावर जोर देण्यात आला आहे. तब्बल 70 टक्के अल्कोहोल बेस्ड सॅनिटायजरचा वापर अत्यंत जलद गतीने वाढत आहे. सॅनिटायजर कोरोना व्हायरसचा खात्मा करतो. यासाठी हात धुण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात सॅनिटायजरचा वापर केला जातो.
डोळ्यात गेल्यास गंभीर स्वरुपात आजारी वा अंधत्व येण्याची भीती
या कारणाने दुकानं, ट्रेन्स आणि घरात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजरचा वापर वाढला आहे. संशोधकांनी सांगितलं की, अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायजर मार्च 2020 पासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात त्यातही लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. भारतीय संशोधकांनी सांगितलं की, सॅनिटायजर लहान मुलांपासून लांब ठेवायला हवं. अशा दोन घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये सॅनिटायजर मुलांच्या डोळ्यात गेला व त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
हे ही वाचा- अवैध लशीचा भयंकर दुष्परिणाम! कोरोनानंतर आणखी एका आजाराचं संकट
डॉक्टरांनी सांगितलं की, लहान मुलांमध्ये सॅनिटायजर डोळ्यात गेल्यामुळे गंभीर रुपात आजारी पडणे वा अंधत्व होण्याची भीती असते. अधिकतर सार्वजनिक जांगावर सॅनिटायजर कमी उंचीवर वा मुलांच्या हाताजवळ ठेवलं जातं, ज्यामुळे मुलं त्याचा वापर करताना डोळ्यात जाण्याची भीती असते. ते म्हणाले की, आमचा सल्ला आहे की, लहान मुलांना सॅनिटायजर लावण्यासाठी लहान मुलांनी मदत करानी. त्याशिवाय कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात धुण्याच्या प्रक्रियेलाच प्राधान्य दिलं जावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus