जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! स्मोकिंगमुळे हळदीसारखं पिवळं धमक पडलं त्याचं शरीर

OMG! स्मोकिंगमुळे हळदीसारखं पिवळं धमक पडलं त्याचं शरीर

फोटो सौजन्य - AsiaWire

फोटो सौजन्य - AsiaWire

या व्यक्तीची तपासणी केली असता धक्कादायक कारण समोर आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 02 फेब्रुवारी : स्मोकिंग तसं (smoking) आरोग्यासाठी घातकच. याचा फुफ्फुसांवर किती विपरित परिणाम होतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सिगारेटचा धूर फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर त्यांची काय अवस्था होते हे कुणाला वेगळं सांगायला नको. पण स्मोकिंगचा जसा शरीराच्या आत परिणाम होतो तसाच शरीरावरही दिसून येतो. स्मोकिंग करणाऱ्यांचे ओठ काळे पडलेले असतात. पण कधी त्यांचं शरीर पिवळं (body turned yellow) पडल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं आहे का? नाही ना. चीनमध्ये असं एक प्रकरण समोर आलं आहे. स्मोकिंग करणाऱ्या एका चिनी व्यक्तीचं शरीर चक्क पिवळं पडलं आहे. चेन स्मोकर असलेल्या या व्यक्तीच्या शरीरावर असा दुष्परिणाम पाहायला मिळाला. त्याचं शरीर हळदीसारखं अगदी गडद पिवळं झालं होतं. शरीर पिवळं पडणं तसं सामान्य आहे. काविळीमध्ये शरीर पिवळं पडतं. पण ते शरीरातील बिलिरुबीन घटकामुळे शरीर पिवळं पडतं. यकृताचा आजार असण्याचंही हे लक्षण आहे. अशावेळी शरीराचा पिवळा रंग हा सामान्य असतो पण चीनच्या जियांग्यु प्रांतातील 60 वर्षांच्या व्यक्तीच्या शरीराचा पिवळा रंग गडद होता आणि याचं कारण म्हणजे स्मोकिंग. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे. हे वाचा - Post Covid-19: कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवू शकतात ‘या’ 5 समस्या द सन च्या रिपोर्टनुसार या व्यक्तीच्या पॅनक्रियाजमध्ये ट्युमर झाला होता आणि तो ट्युमर इतका मोठा होता की, त्याच्या पित्त नलिकाही ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे त्याला कावीळ झाली. ही व्यक्ती स्मोकिंग करत असल्यानं पेशींचा आकारही सामान्यपेक्षा जास्त झाला आणि अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन करून व्यक्तीच्या शरीरातील ट्युमर काढण्यात आलं आहे, त्यानंतर त्याच्या त्वचेचा रंग सामान्य झाला. पण जर तो तसाच स्मोकिंग करत राहिला तर पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या व्यक्तीनं जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: health , smoking
  • First Published :
जाहिरात
जाहिरात