व्हिटॅमिन-सी (Vitamin C) ला सर्वात सुरक्षिक पोषक घटक मानलं जातं. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचं ठरतं. इतकंच नव्हे तर त्वचा, केस, चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांनी याचे फायदे सांगितलेत.
स्ट्रेस - स्ट्रेसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, अशा लोकांसाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरू शकतं, असं काही संशोधनात दिसून आलं आहे. जे लोक जास्त मद्यपान, धूम्रपान करतात, ज्यांना लठ्ठपणा बळावला आहे त्यांच्यामध्येही व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते.
सर्दी-ताप - फ्लूसारख्या लक्षणांपासून आराम देण्यात व्हिटॅमिन सी मदत करू शकतं. जेणेकरून ते इतर गंभीर आजारांचं रूप घेणार नाही.
स्किन एजिंग - शरीरात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असल्यास त्वचेच्या समस्या बळावत नाहीत, त्वचेवर नैसर्गिक कोमलता कायम राहते. व्हिटॅमिन सीमुळे सूज, स्नायूंना हानी कमी पोहोचते.
वेगवेगळ्या पदार्थांमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळू शकतं. आंबट फळं व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत आहेत. याशिवाय ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, आंबा, पपई, फ्लॉवर, कोबी यातूनही व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळे यांचा आहारात समावेश करा.