Home /News /lifestyle /

कोरोना रुग्णानं उपवास करणं योग्य आहे की नाही?

कोरोना रुग्णानं उपवास करणं योग्य आहे की नाही?

कोरोनाव्हायरसशी (coronavirus) लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे आणि उपवासामुळे (fasting) त्यावर काही परिणाम होतो का?

    मुंबई, 06 मे : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) या युद्धातच लोकं आपल्या घरांमध्ये सण साजरे करत आहेत. सध्या मुस्लिम समाजाचा रमजान (ramdan) महिना सुरू आहे. या महिन्यात ते रोजा म्हणजे उपवास करतात. मात्र ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी उपवास (coronav patient fasting) करणं कितपत योग्य आहे? उपवास केल्यानं त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे, ते या व्हायरवर मात करत ठणठणीत होत आहेत. अशात जर  उपवास केला तर त्याचा परिणाम कसा होईल, असा प्रश्न आहे. हे वाचा - कोरोनाव्हायरसविरोधातील लसीचं ह्युमन ट्रायल सुरू, आता परिणामांची प्रतीक्षा डायचे वेलेवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार उपवासादरम्यान रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होतं, असा अद्याप तरी कोणता रिसर्च नाही. त्यामुळे कोरोनाव्हायरस आणि उपवास यांच्या संबंधांबाबत पुरावे नाहीत. मात्र हा व्हायरस नवा आह आणि तो वारंवार बदलतो आहे. रमजानमध्ये जो उपवास केला जातो तो पहाटेपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे जवळपास 14 तासांचा असतो. एक निरोगी शरीर हा उपवास करू शकतो. उपवास तसा शरीरासाठी चांगला मानला जातो, मात्र अशावेळी शरीरात तरल पदार्थांची कमतरता होते आणि आजारी व्यक्तीला सामान्यपणे तरल पदार्थांची गरज असते, कारण त्यामुळेत त्यांना आजाराशी लढण्यासाठी ताकद मिळते. हे वाचा - कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार, कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आणि इतर आजाराच्या रुग्णांनीही उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण एखाद्या रुग्णाला व्हायरसचं संक्रमण किती आहे आणि उपवासामुळे त्याला काही नुकसान तर होणार नाही ना हे फक्त डॉक्टरच सांगत आहे. मुस्लिम धर्मात वय, आजार, गर्भवती महिलाआणि प्रवासी आणि काही विशेष परिस्थितीत उपवासात काही प्रकारच्या सूट आहेत. त्यामुळे शक्य असेल तर उपवास टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Ramdan

    पुढील बातम्या