मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Chanakya Niti: जर महिला 'हे' काम करत असतील, तर पुरुषांनी कधीही पाहू नये

Chanakya Niti: जर महिला 'हे' काम करत असतील, तर पुरुषांनी कधीही पाहू नये

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांशी कसं राहायला पाहिजे किंवा आयुष्य कसं जगायला हवं, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत जर कोणीही चाणकी नीतिच्या अगदी उलट वागत असतील, तर ती व्यक्ती हळूहळू अधोगतीकडे जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २६ नोव्हेंबर : जगभरातील लोक आचार्य चाणक्यांची नीति फॉलो करतात. आयुष्यात यश मिळवण्यासाठी, तसेच नातेसंबंध समजून घेण्यासाठी चाणक्य नीति नेहमीच मदत करते. या नीतिला तुम्ही नीट समजून तुमच्या आयुष्यात अंमलात आणाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, असा सल्ला तुम्हाला अनेक लोक देतील. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणांमध्ये स्त्री-पुरुषांसाठी काही विशेष तत्त्वे दिली आहेत.

स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांशी कसं राहायला पाहिजे किंवा आयुष्य कसं जगायला हवं, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत जर कोणीही चाणकी नीतिच्या अगदी उलट वागत असतील, तर ती व्यक्ती हळूहळू अधोगतीकडे जाईल.

हे ही वाचा : 'या' तीन सवयींमुळे महिला नेहमीच येतात अडचणीत, पाहा काय सांगते Chanakya Niti

चाणक्यांनी धर्म, अर्थ, कार्य, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, संबंध, देश आणि जग यांविषयीची तत्त्वे तसेच इतर अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात दिल्या आहेत. चाणक्यांच्या नीतिमत्तेची ही तत्त्वे सर्वांत समर्पक आहेत.

चाणक्यांनी पुरुषांना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून ते जीवनात नेहमीच प्रगती करतील आणि अधोगतीकडे जाण्याचा मार्ग त्यांना केव्हाच सापडणार नाही.

जेवणाऱ्या बायकांकडे बघू नका

चाणक्य स्पष्ट सांगतात की, शिष्टाचाराच्या कक्षेत राहून जर अन्न खाल्ले गेले तर ते केव्हाही चांगले असते. त्यामुळे जेवण जेवणाऱ्या स्त्रीने पुरुषांना पाहू नये. कारण असं केल्याने स्त्रिया अस्वस्थ होतात आणि त्या नीट जेवत नाहीत आणि हे केव्हा ही चांगले नाही.

तरी आत्ताचा काळ बदलला आहे. आधी महिला लपून किंवा तोडं पदराने झाकून जेवायचे. पण आता काळ बदलला आहे. त्यामुळे गोष्टी बदलू शकतात. पण असं असलं तरी देखील पुरुषांनी महिलांना जेवणासंदर्भात कोणत्याच गोष्टीत डिस्टर्ब करु नये.

स्त्रिया कपडे ठिक करत असतील तर...

चाणक्यांच्या मते, जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तिच्या शरीरावरचे कपडे ठीक करत असते, तेव्हा पुरुषांनी आपली नजर तेथून हटवावी. असं असलं तरी बऱ्याचदा समाजात वावरताना असं होत नाही. असे अनेक पुरुष आहेत, जे अशा संधीचीच वाट पाहात असतात. पण नीतिशास्त्रात हा गुन्हा आहे.

यासोबतच चाणक्य सांगतात की, महिला शिंकताना आणि जांभई देताना पुरुषांनी त्यांच्याकडे पाहू नये. तुमचं असं वागणं तुम्हाला नेहमीच अधोगतीकडे नेईल.

श्रृंगार करणारी स्त्री

चाणक्य सांगतात की, काजळ, मेकअप करणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या महिलांना पुरुषांनी पाहू नये. हे आचरण प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.

त्याचबरोबर एखादी महिला जर एखाद्या मुलाला तेलाची मालिश करत असेल, तर पुरुषांनी त्याकडे पाहू नये. असं करणं योग्य मानलं जात नाही.

First published:

Tags: Acharya chanakya, Viral, Wife and husband, Women