मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'या' तीन सवयींमुळे महिला नेहमीच येतात अडचणीत, पाहा काय सांगते Chanakya Niti

'या' तीन सवयींमुळे महिला नेहमीच येतात अडचणीत, पाहा काय सांगते Chanakya Niti

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्या स्वत: अडकतात आणि कुटुंबीय देखील त्यांना चुकीचं समजू लागतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २४ नोव्हेंबर : लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात खुप मोठे बदल होऊ लागतात. नवीन लोकांपासून ते नवीन चालीरितींपर्यंत सगळ्याच गोष्टींशी त्यांना मिळत जुळतं घ्यावं लागतं. तसेच त्यांच्यावर जबाबदारी देखील पडते. महिला त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील करतात. कधी कधी अशावेळेला त्या स्वत: आपल्या आवडी निवडीकडे देखील लक्ष देत नाहीत आणि आपल्याला पूर्ण संसारात झोकून देतात.

पण असं करत असताना महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्या स्वत: अडकतात आणि कुटुंबीय देखील त्यांना चुकीचं समजू लागतात.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या पुस्तकामध्ये समाजातील अनेक गोष्टींबद्दल लिहून ठेवलं आहे. ज्यामध्ये त्यांनी नवरा-बायकोच्या नात्यापासून ते महिला, पुरुष यांचं वागणं आणि यशाच्या गुरुकिल्ली पर्यंत बरंच काही लिहिलं आहे. अनेक लोक त्यांचे विचार आणि नीति फॉलो देखील करतात.

हे ही वाचा : Chanakya Niti : 'या' विशेष गुण असलेल्या महिलांकडे लवकर आकर्षित होतात पुरुष

चाणक्य म्हणतात की स्त्रीचे गुण आणि अवगुण स्वतःसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतात. त्यामुळे स्त्रीचं वागणं हे नेहमीच तिच्या कुटुंबावर प्रभाव टाकत असतं.

स्त्री आनंदी आणि सुसंस्कृत असेल तर तिच्या कुटुंबातील व्यक्ती देखील आनंदी राहातील, पण स्त्रीचा स्वभाव जर उधळा असेल तर मात्र त्या कुटुंबाचा विनाश अटळ असतो.

चाणक्यने सांगितले आहे की स्त्रिया त्यांच्या काही सवयींमुळे नेहमीच त्रस्त असतात. या सवयी वरचढ ठरल्या तर केवळ स्त्रीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन नरक बनते.

चाणक्यानुसार महिलांच्या त्या तीन सवयींबद्दल जाणून घेऊ या.

खोटं

'अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभिता।' चाणक्य यांनी या श्लोकाच्या माध्यमातून सांगितले आहे की, ज्या स्त्रियांना खोटे बोलण्याची सवय असते त्या स्वतःच्या खोट्याच्या जाळ्यात अडकतात. तसेच, खोटे बोलण्याची सवय कोणालाही असू शकते आणि लहान मोठं खोटं सगळेच बोलतात.

परंतु जर घराची गृहिणी नेहमीच खोट बोलत असेल आणि खोट्यामध्येच आयुष्य जगत असेल. तर मात्र तिच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला समस्यांना सामोरे जावे लागते.

खोट्याने क्षणभर आनंद मिळतो, पण सत्य बाहेर आल्यावर कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लागते. ही गोष्ट पुरुषांनाही लागू होते.

सक्तीची संमती

सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीचे प्रत्येक निर्णयात एकच मत असणे आवश्यक आहे. चाणक्य सांगतात की काही प्रकरणांमध्ये महिला काही कारणास्तव किंवा अनुपस्थितीमुळे कुटुंब किंवा पतीसमोर आपली बाजू मांडत नाहीत आणि नंतर त्याच गोष्टीचा विचार करत बसतात. ज्याचा कुटुंबावर वाईट परिणाम होतो.

तुम्हाला जे वाटतं, ते तेव्हाच्या तेव्हा सांगा, तुम्हाला काहीही आवडत नसेल तर, लगेच सांगा. म्हणजे तुम्हाला पुढे त्याचा त्रास किंवा पश्चाताप होणार नाही.

चाणक्य म्हणतात की पुरुष असो किंवा स्त्री, तुम्ही तुमचे शब्द परिस्थितीनुसार पाळले पाहिजेत, कारण तुमचे शब्द तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवू शकतात.

आजारांकडे दुर्लक्ष करणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, महिलांना अनेकदा आपले आजार लपवण्याची सवय असते. तिची तब्येत बिघडली असतानाही ती आपल्या पती किंवा कुटुंबाला हे सांगत नाही, ती स्वतः तणावाचा सामना करत राहते, ज्याचा तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

बराच काळ योग्य उपचार न मिळाल्याने महिलांना आजार जडतात, त्यामुळे केवळ तीच नाही तर कुटुंबालाही याचा त्रास होतो.

First published:

Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Marathi news, Top trending, Women