नवी दिल्ली, 3 जून: आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things) ओळखण्याची क्षमता (Capacity) येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life) जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी, चतुर, मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. चाणक्य नीति लोकांचं भविष्य उज्ज्वल बनवते आणि जीवन सुखी, शांतीपूर्ण करते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून जीवनातल्या काही अडचणीवर उपाय सांगितले आहेत. चाणक्य नीति सांगते, आयुष्यात सफल होण्यासाठी दृष्ट लोकांपासून दूर राहिले पाहिजे. लक्ष्मीची कृपा होत नाही - चाणक्य नीतिनुसार, जे अस्वच्छ कपडे घालतात. दात साफ करत नाहीत, दुसऱ्यांचं मन दुखवतात, सूर्योदयानंतर उठतात अशा व्यक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी लक्ष्मी त्यांच्यावर कधीच कृपा करत नाही. दुष्टांपासून सावधान - आचार्य चाणक्य यांच्या मते, रस्त्यांतील काटे आणि दुष्ट लोकांपासून आपला बचाव करावा. ज्याप्रकारे काट्यापासून वाचण्यासाठी आपण पायात चप्पल घालतो. त्याप्रकारे दुष्ट लोकांचा इतका अपमान करा की ते मान उचलून तुमच्याकडे पाहणार देखील नाहीत आणि तुमच्या आयुष्यातून दूर जातील. ( Shocking! अंतिम दर्शन सुरू असताना अचानक उठून बसला मृतदेह; VIDEO पाहून फुटेल घाम ) खरी संपत्ती - चाणक्य नीतिनुसार, जेव्हा माणूस संपत्ती गमावतो तेव्हा मित्र, पत्नी, नोकर-चाकर, नातलग सगळेच लोक त्याच्या पासून दूर होतात. जेव्हा संपत्ती परत येते, तेव्हा हे सगळे लोक परत येतात. त्यामुळेच चांगले नातलग हिच खरी संपत्ती आहेत. दानशूर बना - आचार्य चाणक्य यांच्यामध्ये, प्रेम हे आयुष्यातलं असं सत्य आहे जे आपण दुसऱ्यांना वाटू शकतो. चांगली बुद्धी आपल्याला वाईट कृत्य करण्यापासून रोखते. दिखाव्याशिवाय केल्या जाणाऱ्या दानाला महत्त्व आहे. ( या 5 राशींना नुकसानाची शक्यता, तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जून महिना ) आत्मनुभूती महत्त्वाची - चाणक्य नीतीच्या मते, चारही वेदांचं ज्ञान असलेल्या मात्र आत्मनुभूती झालेली नाही, असा माणूस केवळ चमचेगिरी करणारा माणूस बनून राहतो. त्यांच्या आयुष्यामध्ये सुंदर पक्वान असून देखील ते त्यांचा उपभोग घेऊ शकत नाहीत. ( चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान ) गुण सोडू नका - आचार्य चाणक्य सांगतात, चंदनाचं झाड तुटल्यानंतर देखील इतरांना सुगंध देतं. हत्ती म्हातारा झाल्यानंतर देखील आपलं गुण टाकत नाही. ऊसाला कितीही पिळलं तरी त्यातून गोड रस येतो. त्याप्रकारे चांगल्या व्यक्ती आपले गुण कधीच सोडत नाहीत. कितीही परिस्थिती बदली तरी ते आपल्या गुणांचा त्याग करत नाहीत. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.