दिल्ली, 10 जून : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीती कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी शिकवल्या.
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रमध्ये आयुष्याचा प्रत्येक भाग उघडून सांगितला आहे. त्यांनी एका चांगल्या आणि यशस्वी लीडरच्या गुणांचं वर्णन केलं आहे. त्याच्यामते ज्याच्या अंगी हे 4 गुण असतील तो नक्कीच यशस्वी होतो. ते गेल्यानंतर देखील लोक त्यांना चांगला नेता म्हणून ओळखतात.
अनेक लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते. कोणतंही चांगलं काम करताना एका चांगल्या लीडरची गरज असते. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीलाच चांगला लीडर म्हटलं जातं.
धैर्य
आचार्य चाणक्यांच्यामते स्वतःचं संतुलन ढळू न देण्यासाठी त्या व्यक्तीकडे धैर्य असावं लागतं. ज्याच्याकडे धैर्य आहे तो कितीही अडचणीच्या काळावर साहसाने मात करून पुढे निघतो. त्यांचे हेच गुण इतरांना देखील प्रेरणा देतात.
जगातली सर्वात मोठी विष्णूची मूर्ती एका मुस्लीम देशात पाहा PHOTOS
असे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. परिस्थिती विरोधामध्ये असेल तर ती पूरक होण्याची वाट बघून त्यानुसार योग्य तो निर्णय घेतात.
गोड वाणी
नीतिशास्त्रानुसार व्यक्तीची ओळख त्याच्या बोलण्यावरून होते. वाईट बोलणारे लोक कुणालाच आवडत नाहीत. उलट गोड आणि चांगलं बोलणारे लोक सगळ्यांमध्ये प्रिय असतात. ते यशस्वी लीडर बनतात. त्यामुळे यशस्वी लीडर बनायचं असेल तर त्यासाठी गोड बोलायला सुरूवात करा.
(Vastu Tips : घरातल्या या 5 वस्तू करतील संपत्तीच्या वाटा बंद;आजच फेका)
दानाचं मोल
ज्या व्यक्तींच्या मनामध्ये दुसऱ्याला दान देण्याची ताकद असते. जे दुसऱ्यांचं दुःख समजू शकतात असेचं चांगला लीडर बनतात. असे लोक नेहमी दान देण्यासाठी पुढे असतात आणि त्यांचा हा गुण सगळ्यांना आवडतो.
निर्णय क्षमता
चांगला लीडर बघण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. आयुष्यात कधी कोणती वेळ घेईल आणि आपल्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी जातील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगला लिडर नेहमीच योग्य तो निर्णय घेत असतो.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti