Home /News /lifestyle /

"चना मसाला, नान आणि...", इंडियन फूडबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष काय काय म्हणाल्या पाहा

"चना मसाला, नान आणि...", इंडियन फूडबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष काय काय म्हणाल्या पाहा

इंडियन फूडबाबत (indian food) सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून तैवानच्या राष्ट्राध्यक्ष (taiwan president) स्वतःला रोखू शकल्या नाहीत.

    तैपई, 17 ऑक्टोबर : इंडियन फूड (Indian food) म्हटलं तर जगभरातील अनेक लोक त्याच्या प्रेमात पडतात. परदेशात राहणारे भारतीयच नाही तर परदेशातील नागरिकांनाही भारतीय पदार्थ आवडतात. परदेशातील लोकप्रिय चेहरेही याला अपवाद नाहीत. कोरोना ल़ॉकडाऊनदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनंतर आता तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील (Taiwan president) भारतीय आहाराबाबतच आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साइ इंग-वेन (Tsai Ing-wen) इंडियन फूडच्या फॅनच आहेत. त्यांनी चक्क आपल्या सोशल मीडियावर आपलं इंडियन फूडबाबत असलेलं प्रेम जाहीर केलं आहे. गुरुवारी त्यांनी एक ट्वीट केलं, ज्यामध्ये त्यांनी भारतीय थाळीचा फोटो शेअर केला आहे. या थाळीत भात, नान, सलाड, डाळ, भाजी दिसत आहे. या फोटोसह साइ इंग-वेन यांनी ट्वीट केलं आहे की, तैवानमध्ये खूप भारतीय रेस्टॉरंट आहेत यासाठी तैवान नशीबवान आहे. तैवानच्या लोकांना भारतीय पदार्थ खूप आवडतात. मला चना मसाला आणि ना खायला खूप आवडतं आणि चहा तर मला माझ्या भारत दौऱ्याची आठवण करून देतो. विविधतेने नटलेल्या आणि रंगबेरंगी भारताशी संबंधित आठवणी ताज्या होतात. हे वाचा - फिनलंडच्या पंतप्रधानांच्या लो कट जॅकेटने खळबळ; सोशल मीडियावर नवा ट्रेंड सुरू वेन यांनी फक्त आपल्याला कोणते पदार्थ आवडतात इतकंच सांगितलं नाही तर त्यांनी या ट्वीटमध्येच इतरांनाही त्यांची फेव्हरेट इंडियन डिश कोणती अशी विचारणा केली आहे. परदेशी नेत्यांना भारतीय आहार आवडणं तसं काही नवं नाही. मे महिन्यातदेखील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरी समोसा बनवला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केला होता. मोदींनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली होती. समोसे खूपचं चविष्ट दिसत आहेत, कोरोनाची महासाथ संपल्यानंतर आपण एकत्र बसून समोसे खाऊ असं मोदी म्हणाले होते. तर भारत आणि तैवानचं म्हणाल तर भारत आणि चीनमधील संबंध बिघडत असताना भारत आणि तैवानमधील संबंध अधिक मजबूत होत आहेत. मागील काही काळापासून दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंध खूपच चांगले झाले आहेत. दोन्ही देशांची मैत्री सध्या चर्चेत आहे. हे वाचा - चिनी राष्ट्राध्यक्षांना कोरोना? संपूर्ण भाषणात खोकत होते Xi Jinping; पाहा VIDEO नुकत्याच पार पडलेल्या तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीयांनी ट्विटरवरुन तैवानमधील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळीदेखील वेन यांनी आभारही मानले होते. तसंच भारतीय लोकं,  भारतीय संस्कृती आणि भारतीय वास्तू रचनेचंही कौतुक केलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, India, Taiwan

    पुढील बातम्या