हेलसिंकी, 16 ऑक्टोबर : फिनलंडच्या पंतप्रधान (finland pm sanna marin) सना मरीन या एका फोटो शूटमध्ये पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एका मॅगझीनने सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो प्रसिद्ध केला. या फोटोशूटमध्ये लो कट जॅकेटमुळे देशात खळबळ उडाली. काही जणांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून फिनिश पंतप्रधानांना खडे बोल सुनावले. खरं तर सना यांच्या ड्रेसमध्ये काहीही अश्लील किंवा अंगप्रदर्शन करणारं नाही. त्यामुळे स्त्रीच्या फोटोला सेक्सिझमच्या चश्म्यातून बघणाऱ्यांचा निषेध म्हणून जगभरात अनेकांनी आता लो नेट किंवा लो कट जॅकेटमधले तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा सपाटा लावला आहे.
फिनलंडच्या 34 वर्षीय पंतप्रधान सना मरीन या स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. ट्रेंडी नावाच्या मॅगझिनने Instagram वर फिनिश पंतप्रधानांचा फोटो शेअर केला. त्यात त्यांनी एका फॉर्मल जॅकेटवर सुंदर नेकपीसही घातला आहे."पंतप्रधान सना मरीन या रोल मॉडेल आहेत. जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे. कामाचा दबाव तर त्यांच्यावर खूप जास्त असतोच. पण व्यवस्थित झोप आणि कणखर मन याची मदत होते." अशा ओळी त्यांच्या फोटोखाली लिहिल्या आहेत.
सना मरीन या डाव्या विचारांकडे झुकणाऱ्या स्त्रीवादी नेत्या समजल्या जातात. फिनलंडमधल्या सनातनी विचारांच्या अनेकांनी त्यांच्या या फोटोवर आक्षेप घेतला. आता साऱ्या जगात फिनलंडची ओळख असं फोटोशूट करणाऱ्या पंतप्रधानांचा देश म्हणून होईल, असे शेरे सोशल मीडियावर उमटायला लागले. या सेक्सिस्ट ताशेऱ्यांना उत्तर म्हणून सना मरीन यांच्या समर्थनार्थ त्यांच्यासारख्याच जॅकेटमध्ये फोटो शेअर होऊ लागले.
त्यांच्या या फोटोवर आक्षेप घेणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून मरीन यांच्या समर्थकांनी लो कट जॅकेटमधले फोटो टाकायचं ठरवलं.
साना मरिन या जगातल्या सर्वांत तरुण महिला राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये त्या फिनलंडच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या.ऑगस्ट महिन्यात सना मरीन यांनी त्यांच्या 16 वर्ष पार्टनरबरोबर लग्न केलं. लग्नाआधी एवढी वर्षं ते लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.
आठवड्यातून तीन दिवस सुट्टीला पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान म्हणूनच सना यांचं नाव जगभरात गाजलं होतं. सहा तासांची शिफ्ट हवी आणि आठवड्यातून 4 दिवसच काम केलं पाहिजे. आयुष्यात कामाबरोबर कौटुंबिक आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे, असं मानणाऱ्यांपैकी सना मरीन या एक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.