मुंबई, 18 एप्रिल: चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवाला (Chaitra Navratri 2021) सुरुवात झाली आहे. देशातील अनेक भागात या नवरात्रातील नऊ दिवस उपवास (Fast) केला जातो. आपल्या देशात उपवासाला बहुतांश भागात साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. तसंच राजगिरा, शिंगाडा, बटाटा, रताळी असे काही ठराविक पदार्थ उपवासाला चालतात. या साहित्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचं सेवन केलं जातं. तरीही उपवासाच्या पदार्थांची यादी जरा मर्यादितच आहे. त्यामुळं तेच तेच पदार्थ खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. काहीतरी नवीन पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते.
ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक नवीन स्वादिष्ट पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. बटाटा-पनीर कोफ्ता (आलू-पनीर कोफ्ता) असं या पदार्थांचं नाव असून,करायला अतिशय सोपा आणि चवीला अतिशय रुचकर असा हा पदार्थ आहे.
बटाटा-पनीर कोफ्तासाठी साहित्य:
किसलेलं पनीर
2 उकडलेले बटाटे
मिरपूड
लाल तिखट
दोन हिरव्या मिरच्या
सैंधव- चवीनुसार
(हे वाचा-तुम्ही कधी 2 लाख रुपयांचा पिझ्झा खाल्लाय? हे आहेत जगभरातील सर्वात महागडे पदार्थ)
दीड चमचे मावा किंवा एक चमचा दूध पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
2 चमचे शिंगाड्याचे पीठ
4-5बदाम
काजू
मनुका
तूप (तळण्यासाठी)
कसा बनवाल हा पदार्थ?
सर्वात प्रथम पनीर (Cottage Cheese) आणि उकडलेले बटाटे (Potato) किसणीवर किसून घ्यावेत. किसलेलं पनीर आणि बटाटे एकत्र करून घ्या. त्यात काळी मिरी, लाल तिखट, हिरवी मिरची, शिंगाडा पीठ (Buckwheat Flour) आणि मावा (Khoya) किंवा दूध पावडर (Milk Powder) घालावी. मावा किंवा दुधाची पावडर नसेल तरीही काही हरकत नाही. त्याशिवायही ही रेसिपी बनवता येते. या सगळ्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. यामुळे चांगली चव येते. यानंतर मिश्रण चांगले मळून घ्यावे. त्याचे लहान लहान गोळे बनवावे.
(हे वाचा-Corona काळातही तुम्ही धुम्रपान करताय? 'या' भीतीपोटी लाखोंनी सोडलं Smoking)
नंतर त्या गोळ्यांमध्ये एक छोटासा खड्डा करून त्यात सुका मेवा भरावा. हे तुमच्या इच्छेवर आहे. तुम्हाला आत सुकामेवा नको असेल तर तुम्ही हे गोळे नुसतेही तळू शकता. कढईत तूप गरम करावे. तुम्हाला तूप नको असेल तर शेंगदाणा तेल देखील वापरूशकता. आता हे गोळे छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या. तुमचे चटपटीत कोफ्ते तयार आहेत. उपवासाला चालणाऱ्या तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर गरमागरम चटपटीत कोफ्ते सर्व्ह करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cottage cheese, Food, Lifestyle, Tasty food