तुम्ही कधी 2 लाख रुपयांचा पिझ्झा खाल्लाय? हे आहेत जगभरातील सर्वात महागडे पदार्थ
खाद्य संस्कृती ही जगभरात विखूरलेली असली तरीही जगभरात असे काही महागडे पदार्थ आहेत ज्यांची किंमत ऐकून तुमच्या तोंडचंं पाणी नक्कीच पळेल.
|
1/ 6
खाद्य संस्कृती ही जगभरात विखुरलेली असली तरीही जगभरात असे काही महागडे व्यंजन आहेत ज्यांची किंमत ऐकून तुमच्या तोंडचं पाणी नक्कीच पळेल. कारण इथे एका पिझ्झाची किंमत 2 लाख रुपये आहे तर पॉपकॉर्न ही पावने दोन लाखांच्या घरात मिळतात. असेच अनेक महागडे पदार्थ जगभरात आहेत.
2/ 6
दुबईतील या आईसक्रीमची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, करण या आईसक्रीमचा एक स्कूप 817 USD ला मिळतो म्हणजेच जवळपास 61,387 रुपये तुम्हाला या आईसक्रीमसाठी मोजावे लागतील. या आईसक्रीमवर 23 कॅरेट सोन्याचा वर्क लावलेला असतो.
3/ 6
हा देखिल दुबई मधील महागडा पदार्थ आहे. ही रॉयल बिर्यानी असून बिर्यानीच्या एका प्लेटसाठी तब्बल 20,000 रुपये खर्च करावे लागतात. यावरही सोन्याचा वर्क लावला जातो.
4/ 6
दिल्लीतील हे गोल्ड पान, यात खजूर, इलायची, गोड चटनी, गुलकंद, लवंग आणि चेरी बिट्स इं साहित्य एकत्रित केलं जातं. शिवाय यावरही ,सोन्याचा वर्क लावला जातो. हे पान 600 रुपयांना विकलं जातं.
5/ 6
शिकागोतील या पॉपकॉर्नची किंमत 2,500 डॉलर म्हणजेच 1,87,855 रुपये इतकी आहे. या पॉपकॉर्नवरही सोन्याचा वर्क लावला जातो.
6/ 6
न्यूयॉर्कमधील या पिझ्झाची किंमत ऐकून कोणीही चक्रावून जाईल. या पिझ्झासाठी तब्बल 2,700 डॉलर म्हणजेच 2,02,928 रुपये मोजावे लागतात. यावरही सोन्याचं आवरण लावलं जातं.