कोरोनामुळे लोकांना उत्तम आरोग्याचं महत्व जाणवू लागलं आहे. त्यामुळे फिटनेसकडे सगळेचजण लक्ष देत आहेत.
इम्युनिटी चांगली राहण्यासाठी लोकांनी धुर्मपान करणंच थांबवलंय. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये स्मोकर्सची संख्या घटल्याचं सर्वेमध्ये समोर आलंय.
2008 पासुन अशा प्रकारच्य़ा सर्वेच्या माध्यमातुन धुम्रपान कमी होण्याचं प्रमाण मोजल जातं आहे. 2019ला करण्यात आलेल्या सर्वेत 16.2 टक्के लोकांनी धुम्रपान सोडण्याचा निश्चय केला होता. तर, 2020 मध्ये धुम्रपान सोडण्याचा निश्चय करणाऱ्यांची संख्या 23.2 टक्के नोंदवली गेलीये. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेतली ही सर्वाधिक टक्केवारी आहे.
आता लोकं हेल्थ ओरियंटेड झालेत. वाईट सवयी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हेल्दी डाएट, व्यायामाबद्दल गंभीरपणे विचार करत आहेत.
मात्र हा बदल तात्पुरता असु शकतो. परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा एकदा स्मोकिंगचं प्रमाण वाढु शकतं असं ब्रिटनमधल्या अँटी स्मोकिंग संस्थांचे मत आहे.
स्टॉप्टुबरसारख्या काही संस्था धूम्रपान करणारऱ्यांना वर्षातून एकदा सिगारेट न पिण्याचे आवाहन करतात. 2019 मध्ये झालेल्या एका अशा कार्यक्रमात 2 लाख लोकांनी भाग घेतला होता.
यावर्षी पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. अशावेळी निरोगी जीवनासाठी तुम्ही धुम्रपानापासून दूर राहणंच योग्य ठरेल