मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Optical Illusion : आहे हिंमत? मग पॅटर्नमधील एक इंग्रजी शब्द आणि संख्या ओळखा, सर्वांत अवघड कोडं

Optical Illusion : आहे हिंमत? मग पॅटर्नमधील एक इंग्रजी शब्द आणि संख्या ओळखा, सर्वांत अवघड कोडं

सर्वांत अवघड कोडं

सर्वांत अवघड कोडं

Can you spot the word and number hidden in this Picture: हे कोडे कदाचित आतापर्यंतच्या सर्वात कठीण ऑप्टिकल इल्युजनपैकी एक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 30 जानेवारी : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टिभ्रम निर्माण करणं. नजरेला धोका देणारे फोटो किंवा चित्रं यांच्याद्वारे दृष्टीला फसवणारं चित्र तयार केलं जातं. अशा चित्रांमधून सांगितलेल्या गोष्टी शोधणं खूप अवघड असतं. त्यासाठी नजर तर तयार लागतेच, तसंच तर्कनिष्ठता आणि बुद्धी यांचाही कस लागतो. या कोड्यांमधून पाहणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही जाणून घेता येतं. त्यामुळे केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर उपचार म्हणूनही या खेळाकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची अनेक कोडी व्हायरल होतात. काही तुलनेनं सोपी असतात, तर काही मात्र डोकं खाजवायला भाग पाडतात. असंच एक अवघड कोडं सध्या व्हायरल होतंय. त्यात हिरव्या रंगाच्या एका पॅटर्नमध्ये एक शब्द आणि संख्या दिली असून, ती शोधायची आहे.

    यातला पॅटर्न इतका विचित्र आहे, की तो पाहिल्यावर डोळे फिरायला लागतील. त्यामुळे त्यातून शब्द आणि संख्या सापडणं खूपच अवघड आहे. 99 टक्के युझर्सना ते शोधणं जमलेलं नाही. ज्यांना जमेल ते खरोखरच बुद्धिमान असतील.

    हा पॅटर्न Rainbow Riches Casino यांनी डिझाइन केला आहे. हिरव्या रंगात व अस्पष्ट असलेला हा डिझाइन पॅटर्न वाचकांना बुचकळ्यात पाडू शकतो. त्यातच एक संख्या आणि शब्द लपलेला आहे. हिरव्या आणि काळ्या रंगाचा वापर करून एक ब्लर पॅटर्न तयार करण्यात आलाय. ज्यांची बुद्धिमत्ता खूप जास्त असेल त्यांनाच त्यात शब्द व संख्या शोधता येईल, असा दावा करण्यात आलाय.

    वाचा - वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पिस्ता, मेंदूवरील तणावही करते कमी

    या ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यात लपलेला शब्द सापडला, तर कदाचित संख्याही सापडणं सोपं होईल. तुम्हाला काहीच सापडत नसेल, तर पॅटर्न पुन्हा एकदा निरखून पाहा. त्यात लपलेला शब्द स्वातंत्र्याशी निगडीत आहे. हा शब्द इंग्रजी आहे. या दोन सूचनांवरून कदाचित उत्तर सापडू शकतं. नाही सापडलं, तर त्याचं उत्तर इथे तुम्हाला मिळेल. तो शब्द Free असा आहे, तर संख्या 30 आहे. हे कोडं इतकं अवघड आहे, की अनेकांना ते सोडवणं जमलेलं नाही. त्यामुळेच या कोड्यासाठी वेळेचं बंधन देण्यात आलेलं नाही.

    ऑप्टिकल इल्युजन्स अर्थात दृष्टिभ्रम तयार करणं हे तितकं सोपं नाही. तसंच ते सोडवणंही खूप अवघड असतं. मेंदूच्या विकासासाठी हा खूप चांगला सराव असतो. एखादी गोष्ट खरोखरच आहे की नाही, हे तपासणं मेंदूला अधिक सक्षम बनवतं. एखाद्या चित्रावरून नजर फिरवणं आणि काळजीपूर्वक पाहणं यातला फरक अशा प्रकारच्या चित्रांवरून स्पष्ट होतो. लहान मुलांसाठीही या एक्सरसाइजचा फायदा होतो. यामुळे आकलनक्षमता विकसित होण्यास मदत होते. विचार करण्याची क्षमता वाढते.

    First published:

    Tags: Brain, Mental health