मुंबई, 30 जानेवारी : उत्तम आरोग्यासाठी आपण सर्व चांगले पदार्थ खायला हवे. बेकरी स्नॅक्सऐवजी तुम्ही अधिक फायदेशीर असणारे पिस्ते खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणेज पिस्ता तुमचे वजन कमी करण्यात मदत करेल. ज्या लोकांना सुका मेवा खायला आवडतो त्यांना काजू, बदामासोबत पिस्तही खायला खूप आवडतो.
हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये शरीरासाठी पोषक असलेले अनेक तत्व असतात. पिस्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट, प्रोटीन, कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, थायामिन आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
जेवणात करा शेंगदाणा तेलाचा समावेश; 'हे' होतील फायदे
वजन करण्यास होते मदत
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इतर पदार्थांपेक्षा पिस्त्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. पिस्त्यामुळे तुम्हाला खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि तुम्ही वारंवार खाणे टाळता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले
पिस्ता फायबरने समृद्ध असतो, ज्यामुळे तुमच्या आतड्याला फायदा होतो. यामुळे तुमचे पोट सहज भरलेले जाणवते. तसेच ते पचनक्रियादेखील उत्तेजित करते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
पिस्ता मेमरी बूस्ट करण्यास मदत करतो
स्मरणशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी पिस्ता खूपच फायदेशीर असतो. नियमितपणे पिस्त्याचे सेवन केल्यास बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
तणाव कमी होतो
तुम्ही तुमच्या घरात नेहमी जास्त स्नॅक्स खाता. पण त्याऐवजी जर तुम्ही पिस्ते खाल्ले तर तुम्हाला कमी तणाव जाणवेल.
मधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का? कसा होतो हेल्थवर परिणाम
कर्करोग रोखण्यास फायदेशीर
पिस्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून रोखतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle