मुंबई २२ नोव्हेंबर : सोशल मीडियावर दिवसेंदिवस नवनवीन खेळ, कोडी येताना दिसतात. परंतु, ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. दृष्टिभ्रमाचे हे खेळ लोकांना चांगलंच खिळवून ठेवतात. तसंच यामुळे अनेकांना आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीची पारख होते. करमणूक हा जरी या खेळाचा मुख्य उद्देश असला, तरी नेटिझन्सच्या संयमाचा कस लागलेला दिसतो. विविध लोकांच्या येणार्या कमेंट्सवरून लोक हा खेळ किती मन लावून खेळतात हे दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर एका चित्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रात कोंबडीचं पिल्लू आपल्या आईपासून वेगळं झालं आहे.
हे ही वाचा : ट्रेन आपला ट्रॅक कसा बदलते? तुम्हाला माहितीय का यामागचे Interesting Facts
तुम्ही लपलेल्या कोंबडीच्या पिल्लाला शोधून काढलंत का? सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे चित्र प्राण्यांचं आहे. या चित्रात खूप प्राणी आहेत. या चित्रातूनच तुम्हाला कोंबडीचं हरवलेलं पिल्लू शोधून काढायचं आहे. या पिल्लाला शोधून काढणं हे अवघड आहे. आतापर्यंत केवळ 1 ते 2 टक्के जणच फक्त या पिल्लाला शोधण्यात यशस्वी झालेत. या चित्रात जे प्राणी दिसतात त्यात आपल्याला एक बदक आणि त्याचं पिल्लू, एक गाय आणि तिचं वासरू, डुक्कर आणि त्याची पिल्लं, कुत्रा आणि त्याचं पिल्लू दिसतंय. तसंच एक कोंबडी आणि तिची तीन पिल्लंही दिसतात. परंतु, कोंबडीचं एक पिल्लू या मोठ्या शेतात कुठेतरी हरवलं आहे. नेटकर्यांना या कोंबडीच्या पिल्लालाच शोधून काढण्यात कोंबडीची मदत करायची आहे, हेच त्यांच्यासाठी आव्हान आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. हरवलेलं कोंबडीचं पिल्लू शोधून काढण्यासाठी नेटिझन्सकडे केवळ 10सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. फक्त 10 सेकंदांचं आहे चॅलेज या चित्रातून कोंबडीचं पिल्लू शोधणं हे सोपं नक्कीच नाही. अशावेळेस तुम्हाला हे चित्र नीट बारकाईने पाहणं आवश्यक आहे. ज्या मातब्बर नेटकर्यांनी हे आव्हान स्वीकारलं, त्यांना दिलेल्या वेळेत ते पूर्ण करता आलं नाहीये. केवळ चित्राकडे नुसतं पाहात राहून उत्तर नक्कीच मिळणार नाही. हीच खरी तर या खेळाची गम्मत आहे. बारकाईने आणि संयमाने नीट पाहिल्यास तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. पण तरीही प्रयत्न करून ज्यांना यश मिळालं नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही एक क्लू देतो. चित्रात डाव्या बाजूला जे कुत्र्याचं घर दिसतंय त्या ठिकाणी निरखून पाहा. तुमच्या लक्षात येईल की कुत्र्याला अगदी बिलगून एक छोटसं पिल्लू बसलेलं आहे.
optical illusion
पण, कुत्र्याचा रंग आणि कोंबडीच्या पिल्लाचा रंग सारखा असल्याने ते ओळखता येत नाही.तरीही तुम्हाला सापडलं नसेल, तर खाली दिलेलं चित्र जरूर पाहा. लाल रंगाने हे पिल्लू हायलाईट केलं आहे.
दररोज सोशल मीडीयावर करमणूकीचे पर्याय उपलब्ध होताना दिसतात. परंतु, तरीही ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांनी आणि खेळांनी आपलं स्थान अजूनही टिकवून ठेवलंय. लोकांच मनोरंजन करण्याचं हे काम दृष्टिभ्रमाचे हे खेळ उत्तमरीत्या करताना दिसत आहेत.