मुंबई ११ नोव्हेंबर : ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाची चित्र किंवा फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होतात. या चित्रांमधून मेंदूला चालना मिळते. डोळ्यांसाठीही ही चित्रं आव्हानात्मक असतात. दृष्टिभ्रमाच्या फोटोंचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसंच काही मानसोपचार थेरपींमध्येही केला जातो. अशा चित्रांमध्ये एखादी वस्तू किंवा चित्र एकमेकांमध्ये अशाप्रकारे काढलेलं असतं, की बघणाऱ्याचा गोंधळ होतो. त्यासाठी बरेचदा एकाच रंगसंगतीचा, चित्राच्या डिझाईनचा किंवा पॅटर्नचा वापर केलेला असतो. अशा प्रकारचे फोटो किंवा चित्र ही मेंदूला खाद्य पुरवणारी असतात. सध्या व्हायरल झालेलं चित्र एका शाळेतल्या वर्गाचं आहे. या फोटोमधील शिक्षकाचा चष्मा वर्गात हरवला आहे. तो शोधण्याचं काम वाचकांना करायचं आहे. दृष्टिभ्रमाचं कोडं असलेलं हे चित्र खूप सुंदर आहे. शाळेच्या एका वर्गात शिक्षक उभे आहेत. त्यांच्यासमोर काही मुलं बाकांवर बसलेली आहेत. मात्र शिक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव मुलांच्या खोडकरपणामुळे वैतागलेले दिसत आहेत. वर्गातली मुलं कागदी विमानं उडवत आहेत. एकमेकांशी खेळत आहेत, गप्पा मारत आहेत. या गोंधळात त्या शिक्षकांचा चष्मा हरवला आहे. हा चष्मा वाचकांना शोधायचा आहे. वर्गामध्ये कागद, वह्या-पुस्तकं, फाईल्स, फळा असं बरंच काही आहे. त्यातच कुठेतरी चष्मा दडलेला आहे. ज्यांचा मेंदू तल्लख असेल ते हा चष्मा लगेचच शोधू शकतील. अशा चित्रांमध्ये लपलेल्या वस्तू शोधण्यासाठी मन एकाग्र करावं लागतं. त्यामुळे साहजिकच मेंदूला चालना मिळते. केवळ मेंदूच नाही, तर डोळ्यांचाही या चित्रांमधील वस्तू शोधण्यात खूप महत्त्वाचा सहभाग असतो. काही वेळेला समोर असूनही ती वस्तू दिसत नाही. म्हणून मग पुन्हा पुन्हा चित्र पाहावं लागतं. या चित्रामध्ये शिक्षकाचा हरवलेला चष्मा शोधून देण्यासाठी वाचकांना बरेच कष्ट घ्यावे लागतील. नाहीच सापडला, आम्ही हिंट देतो. शिक्षकाच्या उजव्या बाजूला मुलांमध्ये बघा सापडतो का चष्मा. आता थोडा मेंदूला ताण देऊन चष्मा शोधण्याचा पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे नक्की सापडेल.
माणसाचा मेंदू गोष्टींचं आकलन कसं करतो, हे जाणून घेण्यासाठीही मानसशास्त्रात दृष्टिभ्रमाचा उपयोग केला जातो. सामान्य माणूस एखाद्या चित्राकडे खूप वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून पाहू शकतो.
त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर येतात. त्याचा उपयोग त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी होतो. मेंदूला अधिक तल्लख करण्याच्या दृष्टीनं दृष्टिभ्रम खूप फायदेशीर ठरतात.