आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनापासून आपला किती बचाव करू शकते?

आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनापासून आपला किती बचाव करू शकते?

कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाल्यानंतर त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती किती कालावधीपर्यंत त्याला विरोध करू शकते, याबाबत संशोधन झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर :  कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभरात थैमान घालतो आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात काही देशांनाच यश आलं आहे. जगभरात जवळपास 4 कोटी लोकांना या विषाणूचा विळखा पडला असून, 12 लाख लोकांचे बळी या साथीनं घेतले आहेत. भारतात 80 लाखांहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे,तर एक लाखांवर लोकांचा बळी गेला आहे.

डोळे, तोंड, नाकावाटे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. श्वासावाटे श्वसननलिकेतून तो फुफ्फुसांकडे जाणाऱ्या खालच्या श्वसनमार्गात पोहोचतो. या विषाणूतील स्पाइक प्रोटिन चावीचं काम करून एपिथेलियल सेलमध्ये अडकतात. या काळात विषाणूचा कुठलाही मागमूस जाणवत नाही. हा इन्क्युबेशन पीरियड असतो. नंतर हळूहळू तो पेशींची कार्ययंत्रणा काबीज करतो आणि त्यांची जागा घ्यायला लागतो. गुणाकार पद्धतीने त्याची वाढ होत राहते. यंत्रणा ढासळायला लागते आणि विषाणू शेजारच्या पेशींवर हल्ला करून त्यांना संक्रमित करतो.

बाह्यहल्ल्यांना तोंड देण्याचं काम करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरात स्वत:ची एक प्रतिरोध यंत्रणा असते. शरीरात झपाट्याने अँटिबॉडीज वाढवण्याचं काम ती करत असतं. मात्र काही वेळा ही रोगप्रतिकारक प्रणाली अतिक्रियाशील होते. संसर्गाशी लढा देणाऱ्या शरीरासाठी ती घातक ठरते.

हे वाचा - रोगप्रतिकारक शक्तीसाठी अति काढा पिणंही हानीकारक; किती असावं प्रमाण जाणून घ्या

शरीरातील केमोकाइन्स हे माहिती देणारे प्रोटिन संसर्ग झालेल्या ठिकाणी एकत्र येण्याचा संदेश रक्तातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना देतात. शरीरात रसायनांची निर्मिती होते आणि बाह्यसंसर्गाशी लढा दिला जातो. इम्युन सेल्सचा प्रकार असलेल्या न्यूट्रोफिल्सला मार्गदर्शन करण्याचं काम असंच सायटोकीन नावाचं रसायन करत असते. बाह्यसंसर्ग शोधण्याच्या या कामात सायटोकीनमुळे हृदयाचे ठोके वाढतात. शरीराचं तापमान वाढतं. रक्ताच्या गाठी होतात. व्हायरसचा नायनाट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सायटोकिनमुळे संवादपेशी न्यूरॉन्सद्वारे मेंदूमधून शरीराचं तापमान आणि इतर शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवलं जातं.

सायटोकिनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यात शरीर असमर्थ ठरतं तेव्हा त्याला सायटोकिन स्टॉर्म असं संबोधलं जातं. सायटोकिनच्या अतिरिक्त निर्मितीमुळे काही वेळा अवयव निकामी होण्याचे प्रकार होतात. सायटोकिन स्टॉर्ममुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होते, अस द प्रिंटमधील बातमीत म्हटलं आहे.

हे वाचा - कैद्यांवरही होत नसेल असा कोरोनाग्रस्तांवर अत्याचार; दिला जातोय भयानक मृत्यू

एका नव्या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची बाब उजेडात आली आहे. विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीच्या अँटीबॉडीजमध्ये झपाट्यानं घसरण होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, जून ते सप्टेंबर काळात अँटिबॉडीजची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या लोकांचं प्रमाण 26 टक्क्यांनी घसरले होतं. तीन महिन्यांच्या काळातच अँटिबॉडीज चाचणी झालेल्यांचं प्रमाण घटलं, असं संशोधक  हेलेन वॉर्ड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या