जास्त रोगप्रतिकारक शक्तीसाठी अति काढा पिणंही हानीकारक; किती असावं प्रमाण जाणून घ्या

काढ्याचं (kadha) अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे काढा कसा बनवावा आणि तो कसा, किती प्यावा याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे जाणून घ्या.

काढ्याचं (kadha) अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे काढा कसा बनवावा आणि तो कसा, किती प्यावा याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे जाणून घ्या.

  • Share this:
    मुंबई, 03 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) स्वत:चा बचाव करावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल अशा काढ्याचं (kadha) सेवन करत आहेत. मात्र भरपूर काढा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढेल असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. काढ्याचं अतिसेवनही तुम्हाला महागात पडू शकतं. काढा नैसर्गिक घटकांनी तयार केला असला तरीदेखील कोणत्याही पदार्थांचं अतिसेवन हानीकारकच आहे. त्यामुळे काढा कसा आणि किती प्यायला हवा याची माहिती तुम्हाला हवी. न्यूयॉर्कमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. निधी पंड्या यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबाबत मार्गदर्शन केलं आहे. डॉ. निधी यांनी सांगितलं, बहुतेक लोकांना वाटतं की आपण आयुर्वेदिक पेय भरपूर प्रमाणात प्यायलो किंवा त्यातील घटक पदार्थ अधिक उकळवले तर अधिक प्रतिकारशक्ती मिळेल. पण इथंच लोक चुकतात. काढे पद्धतशीरपणे घेतले नाहीत तर आरोग्याला हानीकारक ठरू शकतात. काढा गरजेपेक्षा जास्त उकळवणं आणि जास्त प्रमाणात पिणं या दोन्हीमुळे शरीरावर चांगल्याऐवजी वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे युरिन इन्फेक्शन, अॅक्ने, पित्त, उष्णता वाढणं, शरीराचा कोरडेपणा वाढणं आणि तोंड येण्यासारखे प्रकार होऊ शकतात" हे वाचा - दातदुखीमुळे चावणंही अशक्य; असे पदार्थ जे भूकही शमवतील, वेदनेपासून देतील मुक्ती काढा नेमका कसा तयार करावा, कसा आणि किती प्यावा याबाबतही डॉ. निधी यांनी सल्ला दिला आहे. काढा जास्त उकळवू नका : काढ्यातल्या औषधी वनस्पती अधिक उकळल्या तर त्याचा जास्त फायदा होतो असं नसतं. काढा कडवट होतो त्यामुळे छातीत जळजळ किंवा पित्त होऊ शकतं. आरोग्यदायी काढा तयार करण्यासाठी थोडासा उकळणं किंवा पाण्यातून वाफा येईपर्यंत उकळणं पुरेसं आहे. दिवसभरात फक्त अर्धा कप काढा प्या: तुम्ही दिवसातून तीनदा काढा घेता का? तर ती सवय मोडायला हवी. हिवाळ्यात तुम्ही दोन कपांपर्यंत काढा घेऊ शकता. थोडे शीतगुणी मसालेही वापरा : तुमच्या काढ्यात थंड गुणधर्म असलेले मसाले टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे पोटाची दुखणी होत नाहीत. ज्येष्ठमध, वेलदोडा किंवा गुलाबाच्या पाकळ्या या काढ्यात घाला. हे वाचा - आठवडाभरापेक्षा जास्त दिवस Nipples ला खाज; गंभीर आणि दुर्मिळ आजाराचं लक्षण साधा आहार घ्या : काढ्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि फोड येतात. त्यामुळे दिवसभर शरीराला थंडावा देणारा संत्रांसारखा साधा आहार घ्या. पाणी पित रहा : पुदिनामिश्रित पाणी किंवा नारळाचं पाणी प्या. त्याने पोट थंड राहिल. नियमितपणे काढा घेऊ नका: दररोज किंवा एकावेळी भरपूर काढा पिऊ नका. तीन आठवडे रोज काढा घेतलात तर 2 आठवडे पिऊ नका. नंतर पुन्हा सुरू करा.
    Published by:Priya Lad
    First published: