• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरोनानंतर ब्रिटिशांचा नवीन ‘5:2 डाएट’; खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काय बदल झालाय?

कोरोनानंतर ब्रिटिशांचा नवीन ‘5:2 डाएट’; खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काय बदल झालाय?

ब्रिटिशांनी खाण्यापिण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. आठवड्यातील सात दिवसांपैकी पाच दिवस ते शाकाहार घेतात तर दोन दिवस मांसाहार घेतात

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर : सजीवांना जिवंत राहण्यासाठी अन्न आणि पाणी आवश्यक असते. सजीवांच्या प्रकारांनुसार त्यांचा आहार असतो. माणसाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, आपण मांसाहार (Non Vegetarian) आणि शाकाहार (Vegetarian) , असा दोन प्रकारचा आहार सेवन करतो. मात्र, माणसांनी आपल्या गरजेनुसार या दोन प्रकारांचे देखील अनेक उपप्रकार शोधून काढले आहेत. रॉ फूड डाएट, कीटो डाएट, लिक्विड डाएट, मेडिटेरियन डाएट असे कितीतरी प्रकार सध्या अस्तित्वात आहे. सेलिब्रेटींसोबत अनेक सामान्य लोक देखील आपल्या खाण्यापिण्याचा सवयींबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे ते देखील आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याच्यादृष्टीनं या डाएट (Diet) प्रकारांचा अवलंब करताना दिसतात. ब्रिटनमधील नागरिकांनी तर एक नवीन डाएट प्रकार सुरू केला आहे. त्यांनी त्याला ‘5:2 डाएट’(5:2 diet), असं नाव दिलं असून सध्या ब्रिटनमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आतून काळा पडलेला बटाटा खराब नव्हे; फेकून देत असाल तर नक्की वाचा त्यामागील कारण सुपरमार्केट स्टोअर वेटरोजनं (Waitrose) ब्रिटनमधील (Britain) नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या 'फूड अॅन्ड ड्रिंक' रिपोर्टसाठी गेल्या वर्षभरात ब्रिटिशांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काय बदल झाले याचा शोध घेण्यात आला. त्यात '5:2 डाएट' बद्दल माहिती समोर आली. ब्रिटिश नागरिक बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. मात्र, कोरोनामुळं गेल्या वर्षभरातील बराचसा काळ त्यांना घरातच रहावं लागलं. याकाळात त्यांनी घरीचं अप्रतिम पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि ते स्वयंपाकाचा आनंद घेऊ लागले. घरी स्वयंपाक करण्याचं प्रमाण इतकं वाढलं की लोकांनी त्यांच्या आवडत्या सँडविचची बाहेर ऑर्डर देणेही बंद केलं आहे. Kitchen Tips: किचन स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स, झटपट होईल साफसफाई यादरम्यानच ब्रिटिशांनी खाण्यापिण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. आठवड्यातील सात दिवसांपैकी पाच दिवस ते शाकाहार घेतात तर दोन दिवस मांसाहार घेतात. शाकाहारामध्ये देखील पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल याचा विचार करून ते शाकाहार घेतात. वेटरोजनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातील माहितीनुसार, ऑनलाइन सर्च दरम्यान देखील लोक हेल्दी फूडचा पर्याय शोधत आहेत. वेटरोजच्या साइटवर बार्बेक्यू टरबूज रेसिपी शोधणाऱ्यांच्या संख्येमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे तर नायकरबॉकर ग्लोरी (Knickerbocker Glory) या आइस्क्रीम (Ice Cream) रेसिपीचा शोध 171 टक्क्यांनी वाढला आहे. याव्यतिरिक्त, तांदूळ आणि व्हिनेगरपासून तयार होत असलेली जपानी डिश सुशीच्या विक्रीत 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाला आणि मसाल्यांच्या विक्रीमध्ये देखील 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, स्टोअरमधील रेडी टू कूक उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झालेल्या उत्पादनांमध्ये सँडविच आणि सॉससारख्या रेडी टू इट (Ready to eat) पदार्थांचा समावेश आहे. Tips : या सोप्या पद्धतीने ओळखा खवा असली आहे की नकली, होणार नाही तुमची फसवणूक याशिवाय बाहेर जेवायला जाण्याऐवजी आता घरीच छोट्या-मोठ्या पार्ट्यांचा ट्रेंड वाढू लागल्याचही वेटरोजच्या अहवालात समोर आलं आहे. घरी पार्ट्यांचे प्रमाण वाढल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत शॅम्पेनच्या विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टिकटॉक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी लोकांना घरगुती पदार्थ खाण्यास प्रोत्साहित केलं आहे. घरच्या घरी पास्ता, चिप्स बनवण्याच्या टिकटॉक ट्रेंडमुळं एअर फ्रायर्सच्या विक्रीत 400 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. या शिवाय फूड डिलिव्हरी अॅपवर देखील घरी बनवता येतील अशाच पदार्थांसाठी साहित्य मागवलं जात आहे. घरच्या घरी जेवण बनवण्यासाठी ब्रिटिश लोक टिकटॉक आणि यूट्यूबवरील कुकिंग टिप्सची मदत घेत आहेत. 31 ऑक्टोबरपासून क्लायमेट चेंजबद्दल (Climate change) एक मोठं संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर वेटरोजनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातील निष्कर्षांना महत्त्वाचे ठरू शकतात. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांनी देखील, आठवड्यातील एक दिवस आहारात दुग्धजन्य पदार्थ न खाण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. एकूणच, कधीकाळी बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे शौकिन असणारे ब्रिटनचे नागरिक आता आपल्या आरोग्याबाबत जागरुक झाल्याचं दिसतं. त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी आता घरी तयार होणाऱ्या जेवणाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
  First published: