• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Kitchen Tips: साफसफाई करण्याचा कंटाळा आलाय? मग फॉलो करा या टिप्स झटपट होईल किचन स्वच्छ

Kitchen Tips: साफसफाई करण्याचा कंटाळा आलाय? मग फॉलो करा या टिप्स झटपट होईल किचन स्वच्छ

Kitchen Tips: किचनची साफसफाई करण्याचा कंटाळा आलाय? या सोप्या टिप्सने झटपट होईल स्वच्छ (Photo - Shutterstock)

Kitchen Tips: किचनची साफसफाई करण्याचा कंटाळा आलाय? या सोप्या टिप्सने झटपट होईल स्वच्छ (Photo - Shutterstock)

स्वयंपाकघराची स्वच्छता करणे मोठे आव्हान असते. पण या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे कामही सोपे करू शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : नवरात्र झाली, दसरा (Dussehra) झाला आता लवकरच दिवाळीचा (Diwali) सण येतोय. दिवाळी म्हटलं की ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांमध्ये विशेष उत्साह दिसतो. दिवाळीत शॉपिंगसह फराळ, फटाके, पंचपक्वान्नांचा छान बेत रंगतो. पण त्या सर्वाआधी महत्त्वाची गोष्ट करायची असते जी खूपच त्रासदायक आणि लोकांच्या नाकीनऊ आणते ती म्हणजे दिवाळीची साफसफाई. त्यातही स्वयंपाकघर स्वच्छ (Kitchen Cleaning) करणं हे महिलांसाठी मोठं आव्हानच असतं. मात्र, स्वयंपाकघर स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स (Kitchen Cleaning Tips) आहेत, ज्या वापरल्यामुळे तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचं काम अधिकच सोपं होईल. 4 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. तर, 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी (Dhanteras) असून त्यापूर्वीच घराची साफसफाई करावी, अशी प्रथा आहे. स्वच्छ घरातच देवी लक्ष्मी निवास करते, असे मानले जाते. अशा परिस्थितीत घरातील स्वयंपाकघर स्वच्छ करणं हे महिलांसाठी मोठे आव्हान ठरू शकतं. कधीकधी ते साफ करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. घरातलं स्वयंपाकघर जरी लहान असलं तरी ते व्यवस्थित आणि स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही हॅक्सबद्दल (Kitchen Cleaning Hacks) माहिती देत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सहज स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. ‘या’ आहेत टिप्स - किचन सिंक स्वच्छ करणं अनेकदा खूप कठीण काम असतं. ते स्वच्छ करण्यासाठी, सर्वांत प्रथम त्यात गरम पाणी टाका. त्यानंतर व्हिनेगर (Vinegar) आणि बेकिंग पावडर (Baking Powder) टाकून ते स्वच्छ करावं. सिंकच्या स्वच्छतेसाठी त्यामध्ये अॅसिड टाकू नका. कारण अॅसिड टाकल्यास त्याचे डाग सिंकला पडू शकतात. वाचा : या सोप्या पद्धतीने ओळखा खवा असली आहे की नकली, होणार नाही तुमची फसवणूक -किचन कॅबिनेट स्वच्छ करणं कधीकधी खूप कठीण असतं. हे स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि डिश वॉश लिक्विड साबण वापरता येईल. यासोबतच तुम्ही चांगले स्क्रबर वापरू शकता. काही वेळात तुमचं कॅबिनेट पूर्णपणे स्वच्छ होईल. -गॅस शेगडी साफ करणं हे सर्वात मोठे आव्हान आहे. शेगडीचा वापर स्वयंपाकघरात सर्वाधिक केला जातो. त्यामुळे गॅस शेगडीची व्यवस्थित स्वच्छता करणे आवश्यक आहे. गॅस शेगडी खोलून स्वच्छ करा. जर तुम्हाला गॅस शेगडी खोलून स्वच्छ करणे शक्य नसेल तर निदान तिचे बर्नर काढून ते स्वच्छ करा. - स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करण्याचे कामही अवघड असते. यासाठी तुम्ही स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात भांडी धुण्याची पावडर, साबण टाका. त्यानंतर स्क्रबरने फरशी नीट घासून घ्या. तुमच्या स्वयंपाकघराची फरशी छान चमकू लागेल. वाचा : घरात मुंग्याची रांग लागली आहे.... यातून वास्तू देत असते विशिष्ट संकेत - स्वयंपाक घरातील बहुतेक घाण गॅस स्टँडजवळ पाहायला मिळते. याठिकाणी भरपूर तेल आणि ग्रीस जमा होते, जे स्वच्छ करणे खूप कठीण होते. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही भांडी धुण्यासाठी वापरत असलेला स्क्रब वापरू शकता. त्या स्क्रबरला साबण लावा आणि फरशी, स्वयंपाक घरातील टाइल्स घासून घ्या. याशिवाय व्हिनेगर, बेकिंग सोडा, अमोनिया आदींचा वापर करून तुम्ही टाइल्स चमकवू शकता. दिवाळी आली की उत्साह असतो. पण दिवाळीसाठी साफसफाई करायची म्हटलं की टाळाटाळ सुरू होते. त्यातही स्वयंपाकघराची स्वच्छता करणे मोठे आव्हान असते. पण या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे कामही सोपे करू शकता.
    First published: