मुंबई, 27 ऑक्टोबर : बटाटे (Potato) शक्यतो लवकर खराब होत नाही. पण काही वेळा वरून चांगले दिसणारे बटाटे मात्र आतून काळे पडलेले असतात. हे बटाटे (Black part inside potato) खराब झालेत असंच आपल्याला वाटतं. त्यामुळे आपण ते फेकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? बटाटे आतून काळे पडणं म्हणजे जे खराब झाले असं नाही. त्यामुळे तुम्हीही असे बटाटे फेकून देत असाल तर बटाटे नेमके काळे का पडतात, असे बटाटे खाणं योग्य आहे का? हे सर्व जाणून घ्या (how to check if potato is good).
इतर भाज्यांप्रमाणे बटाटे खराब (how to check if potato is good) झाल्याचं बाहेरून लक्षात येत नाही. कित्येक वेळा आपण बटाटे कापल्यानंतर आतमध्ये काळसर (Black part inside potato) असल्याचं लक्षात येतं.
सध्या बटाट्याचा सीझन नाही. त्यामुळे बाजारात मिळणारे बटाटेदेखील जुने झालेले असतात. हे बटाटे खराब होऊ नयेत म्हणून कित्येक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये (Effect of cold storage on potato) ठेवलेले असतात. अधिक काळ थंड ठिकाणी राहिल्यामुळे या बटाट्यांना आतून काळसरपणा येतो. याला ‘चिलिंग इंज्युरी’ (Potato Chilling injury) म्हणून ओळखलं जातं. ऑफ-सीझनला अशा प्रकारची समस्या आपल्याला वारंवार जाणवू शकते. मग अशा वेळी काय करायचं? आतून काळसर भाग असणारे हे बटाटे खायचे, की टाकून द्यायचे?
हे वाचा - Kitchen Tips: किचन स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स, झटपट होईल साफसफाई
खरं तर, आतमध्ये काळसर असणारे हे बटाटे खराब (Shall we eat potato with black part) झालेले नसतात. पण खराब दिसत असेल, तर मग तुम्ही फक्त त्यातला काळसर भाग कापून फेकून देऊ शकता आणि बाकीचा बटाटा बिनधास्त वापरू शकता. याची खात्री करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एक प्रयोगही करू शकता. तुम्ही एखादा बटाटा फ्रीजमध्ये ठेवून, काही दिवसांनी त्याचं निरीक्षण करू शकता. या बटाट्यामध्येदेखील काळसर भाग तयार होईल. अर्थात, याचा अर्थ असा नाही की तो बटाटा खराब झाला आहे.
हे वाचा - Tips : या सोप्या पद्धतीने ओळखा खवा असली आहे की नकली, होणार नाही तुमची फसवणूक
विशेष म्हणजे, काळसर झालेले हे बटाटे चवीला खरं तर गोड (Black potato sweeter than usual) असतात. कमी तापमानात राहिल्यामुळे या बटाट्यांमधल्या स्टार्चचं रूपांतर साखरेत होतं; पण ही प्रक्रिया उलटदेखील होऊ शकते. म्हणजेच, फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलेला बटाटा बाहेर काढून ठेवला, तर काही काळानंतर त्यात तयार झालेली साखर पुन्हा स्टार्चमध्ये रूपांतरित होऊ शकते. एकंदरीत, तुम्ही घेतलेल्या बटाट्यांमध्ये आतील भाग काळसर असला, तरी तो बटाटा खाण्यायोग्य असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.