डेहराडून, 21 जानेवारी : अनेकदा प्रेमात (love) ब्रेकअप (breakup) झाल्यावर बहुतेकजण प्रचंड निराश होता, काहीजण तर आत्महत्येचं पाऊलही उचलतात. मात्र एका 21 वर्षीय तरुणांनं मात्र यातून सावरत आगळंवेगळं पाऊल उचललं आहे.
ही कथा आहे डेहराडूनच्या (Dehradun) एकवीसवर्षीय दिव्यांशू बत्रा याची. या दिव्यांशूचा ब्रेकअप झाला. त्यातून तो निराश झाला नाही. डेहराडूनच्या जीएमएस रोडवर त्यानं चहाचा कॅफे (tea cafe) उघडला. या दुकानाला त्यानं 'दिल टूटा आशिक - चाय वाला' असं भन्नाट नावसुद्धा दिलं आहे.
याबद्दल दिव्यांशू सांगतो, की हायस्कूलच्या दिवसांपासून माझी एक गर्लफ्रेंड (girlfriend) होती. मागच्यावर्षी आमचं ब्रेकअप (breakup) झालं. कारण त्या मुलीचे पालक (parents) आमच्या प्रेमाच्या विरोधात होते. आम्हा दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर मी 6 महिने एकदम उदास, अस्वस्थ असायचो. सोबतच पबजीसुद्धा खेळत वेळ वाया घालवायचो.
नंतर मात्र दिव्यांशूनं मनाशी काहीएक निश्चय केला. त्यानं आपल्या भावासोबत मिळून हा कॅफे उघडला. दुकानाचं नाव त्याला काहीतरी लक्षवेधी ठेवायचं होतं. त्यातूनच त्यानं आपल्या ब्रेकअपचा संदर्भ घेत 'दिल टूटा - आशिक चायवाला' असं नाव दुकानाला दिलं. विशेष म्हणजे, पूर्वी केलेल्या बचतीतून त्यानं कॅफेसाठी हे भांडवल उभं केलं. या कॅफेच्या माध्यमातून तो त्याच्यासारख्याच ब्रेकअपच्या वाईट अनुभवातून (sorrow) जाणाऱ्यांची मदत करणार आहे.
याबाबत तो म्हणतो, 'माझ्यासारखे या जगात अनेकलोक असतील ज्यांना ब्रेकअप पचवायला जड जातो. ते वेदनादायी अनुभवातून जातात. माझी इच्छा आहे, की अशा लोकांनी इथं येऊन आपलं दुःख शेअर करावं. दिव्यांशूच्या या कॅफेची कथा सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.