Home /News /lifestyle /

पत्नी की वडील? मृत व्यक्तीच्या स्पर्मवर कोणाचा हक्क; उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

पत्नी की वडील? मृत व्यक्तीच्या स्पर्मवर कोणाचा हक्क; उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

सध्या मोठ्या प्रमाणात विवाहित दाम्पत्य पुरुषाचे शुक्राणू साठवून ठेवत असल्याचं समोर आलं आहे

    पश्चिम बंगाल, 22 जानेवारी : कलकत्ता उच्च न्यायालयाने एक अनोख्या प्रकरणावर निर्वाळा दिला आहे. येथील एका वडिलांनी आपल्या मुलांच्या जमा केलेल्या स्पर्मवर हक्क दाखविला होता. या प्रकरणात कोर्टाने सांगितलं की, मृत व्यक्तीशिवाय त्याच्या पत्नीजवळ स्पर्मवर हक्क दाखविण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांनी सांगितलं की, याचिकाकर्त्याजवळ आपल्या मुलाच्या संरक्षित शुक्राणू मिळविण्याचा मूलभूत अधिकार नाही. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितलं की, त्यांच्या मुलाच्या विधवा पत्नीला या प्रकरणात 'नो ऑब्जेक्शन' देण्यासाठी निर्देशित केलं जायला हवं, किंवा कमीत कमी त्यांच्या अर्जाला उत्तर द्यायला हवं. मात्र न्यायालयाने वकिलाचा हा अर्ज फेटाळला. न्यायालयाने सांगितलं की, दिल्लीतील एका रुग्णालयात ठेवलेले शुक्राणू मृत व्यक्तीचे आहेत आणि ते दोघे मृत्यूपर्यंत वैवाहिक संबंधात होते. यासाठी मृत व्यक्तीशिवाय केवळ त्यांच्या पत्नीचा यावर अधिकार आहे. याचिकाकर्त्याने सांगितलं की, त्यांना मुलगा थॅलेसीमियाचा रुग्ण होता आणि भविष्यात उपयोगासाठी आपले शुक्राणू दिल्लीतील रुग्णालयात सुरक्षित ठेवले होते. वकिलाने दिलेल्या माहितीनुसार याचिकाकर्त्याने आपल्या मुलाच्या निधनानंतर रुग्णालयातून तेथे मुलाच्या शुक्राणू मिळविण्यासाठी संपर्क केला. रुग्णालयाने त्यांना सूचित केलं की, यासाठी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता असेल आणि विवाहाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. हे ही वाचा-10 लग्न केल्यानंतरही झालं नाही मूल; शेवटी शेतात मृत अवस्थेत आढळला शेतकरी भारतात 2009 मध्ये पहिल्यांदा झालं होतं मृत पतीच्या स्पर्ममधून संतानप्राप्ती भारतात 2009 मध्ये दिवंगत पतीच्या शुक्राणुतून पहिल्यांदा एका भारतीय महिलेला पूत्रप्राप्ती झाली. पतीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनंतर पूजा नावाची एक महिला गर्भवती झाली आणि तिने कलकत्त्यातील एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला. पूजाने आपल्या दिवंगत पती राजीव याच्या शुक्राणूच्या मदतीने गर्भधारणा केली. या दाम्पत्याने 2003 मध्ये कृत्रिम गर्भधारणेतून प्रयत्न सुरू केला होता. पूजा आई होईल, यापूर्वीच 2006 मध्ये राजीवचा मृत्यू झाला. दोन वर्षांनंतर पूजाला कळालं की, त्याच्या पतीचे शुक्राणू रुग्णालयातील स्पर्म बँकेत सुरक्षित आहे. पूजाने डॉक्टरांशी संपर्क केला आणि त्यानंतर वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेतला. यानंतर डॉ. वैद्यनाथ चक्रवर्तींनी पूजावर उपचार सुरू केले आणि ती गर्भवती झाली. आई झाल्यानंतर पूजा म्हणाली होती की, मला ओरडून सर्वांना सांगायचं की माझे पती परत आले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: West bangal

    पुढील बातम्या