मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मॉडेलसोबत रोमान्स करताना अचानक आली बायको; लपण्याच्या धडपडीत गायकाने गमावला जीव

मॉडेलसोबत रोमान्स करताना अचानक आली बायको; लपण्याच्या धडपडीत गायकाने गमावला जीव

बायकोने आपल्याला रंगेहाथ पकडू नये म्हणून गायकाने केलेला प्रयत्न त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.

बायकोने आपल्याला रंगेहाथ पकडू नये म्हणून गायकाने केलेला प्रयत्न त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.

बायकोने आपल्याला रंगेहाथ पकडू नये म्हणून गायकाने केलेला प्रयत्न त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.

  • Published by:  Priya Lad

 ब्राझिलिया 21, मे : काही जणांचे विवाहबाह्य संबंध (Extra marital affair) असतात. घरवाली आणि बाहरवाली असं सांभाळता सांभळता तारेवरची जणू कसरतच करावी लागते. त्यातही जर रंगेहाथ पकडलं गेलं तर मग काही खरं नाही. पार्टनरपासून वाचण्यासाठी काय काय नाही करावं लागतं. असेच विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या एका गायकाने बायकोपासून लपण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे. ब्राझीलमधील गायक (Brazilian singer) एमसी केविनचा (Singer MC Kavin) इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला आहे.

23 वर्षांचा एमसी केविन दोन आठवड्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको डिओलेन क्रिमिनल लॉयर आहे. लग्नानंतर केविन आपला मित्र विक्टरससोबत रिओ जी जेनेरियातील एका हॉटेलमध्ये  होता. तिथं 26 वर्षांची मॉडेल बियांकाशी त्यांची भेट झाली. त्यानंतर केविन आणि विक्टरने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. बियाकांने सुरुवातीला नकार दिला पण दोघांनीही पैसे द्यावेत या अटीवर ती तयार झाली.

हे वाचा - Online selling मध्ये लोचा! कारसह त्याच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो गेले आणि...

केविनने आपलं लग्न झालं त्यामुळे आपल्यात जे काही होत आहे ते मॉडेलला सिक्रेट ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर  त्यानंतर हॉटेलमधील क्रुझ नावाची व्यक्ती केविनकडे आली. या ऑफरबाबत आपल्याला माहिती असून आपल्याला या डीलमध्ये सहभागी करून घेण्याबाबत तो म्हणाला. पण विक्टर आणि केविनने त्याला पळवून लावलं. त्यानंतर क्रुझने केविनच्या सुरक्षारक्षकाला केविनची बायको त्याला शोधत असल्याचं सांगितलं.

केविनची बायकोसुद्धा त्याच हॉटेलमध्ये होती. केविनला हे माहिती नव्हतं, पण क्रुझला माहिती होतं. केविनच्या सुरक्षारक्षकाने विक्टरला याची माहिती दिली. विक्टरनेसुद्धा केविनला सावध केलं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळाने विक्टर वॉशरूमला जात होता. तेव्हा केविनची पत्नी त्यांच्या रूममध्ये आल्याचं त्याने पाहिलं.

हे वाचा - Fungus मुळे लैंगिकदृष्ट्या उतावळा होतो हा जीव; 4-6 आठवडे संबंधांनंतर होतो मृत्यू

बायकोने आपल्याला रंगेहाथ पकडू नये म्हणून केविनने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. तो बाल्कनीला लटकत होता. पण त्याचा पाय घसरला आणि पाचव्या मजल्यावरून तो कोसळला.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

First published:

Tags: Love, Relationship, Sex, Singer, Wife and husband