Home /News /viral /

लेकीने आई-वडिलांना दाखवलं असं लेटर; दोघेही झाले हैराण, 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला हा VIDEO

लेकीने आई-वडिलांना दाखवलं असं लेटर; दोघेही झाले हैराण, 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला हा VIDEO

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    आयुष्यात जेव्हा आपण खूप आनंदी होतो, तेव्हा तो आनंद आपण सर्वात आधी आपल्या आई-वडिलांसोबत शेअर करतो. कारण जितके आनंदी आई-वडील आपल्या मुलांसाठी होतात, तितकं आनंदी कोणीच राहू शकत नाही. इतकच नाही तर मुलांचं यश पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. ज्यातून सहज कळतं की ते किती आनंदी आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलीने आपल्या आई-वडिलांचा आनंद कॅमेऱ्यात कैद केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक मुलगी लेटर घेऊन आई-वडिलांना देते. यानंतर ती समोर कॅमेरा ऑन करते आणि लेटर वाचायला सांगते. जसं आई-बाबा लेटर वाचायला सुरुवात करतात, दोघांच्या आनंदाचा ठावठिकाणी राहत नाही. लेटर वाचल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. सोबतच या व्हिडिओवर खूप कमेंट्सही केल्या जात आहेत. हे ही वाचा-घृणास्पद! Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL हा व्हिडिओ गुरजीव नावाच्या यूजरने शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं की, आम्ही एक्स्ट्रा क्रेडिटसाठी हा व्हिडिओ तयार करीत आहे. मात्र खरं पाहता ते जे वाचत आहे, ते Optometry शाळेचा पहिला एक्सेप्टेंस लेटर होतं.'हा व्हिडिओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की, आई-वडिलांसाठी मुलांचं यश आणि त्यांचा आनंद सर्वकाही आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Father, Mother, Video viral

    पुढील बातम्या