मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नाला बोलावलं आणि पाहुण्यांकडून घेतली भांडी घासून; कडकीत असलेल्या वधु-वराचा विचित्र फंडा

लग्नाला बोलावलं आणि पाहुण्यांकडून घेतली भांडी घासून; कडकीत असलेल्या वधु-वराचा विचित्र फंडा

भांडी घासायला सांगितल्यानंतर नटून थटून आलेल्या सर्व महिलांना जबर धक्काच बसला.

भांडी घासायला सांगितल्यानंतर नटून थटून आलेल्या सर्व महिलांना जबर धक्काच बसला.

भांडी घासायला सांगितल्यानंतर नटून थटून आलेल्या सर्व महिलांना जबर धक्काच बसला.

नवी दिल्ली, 1 जुलै : सर्वसाधारणपणे लग्न (Wedding) म्हणजे आनंद, मज्जा, सेलिब्रेशन. मात्र यातही अनेकदा विचित्र अशा घटनाही समोर येतात. आणि या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहतात. अनेकदा अशा गोष्टी आठवून आश्चर्यच वाटायला लागतं. Reddit वर एका युजरने लग्नातील घडलेली घटना (Wedding Story) शेअर केली आहे. जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

लग्नात झाला अजब कारनामा

Reddit वर पोस्ट केलेल्या या स्टोरीनुसार, एका कपलने (Bride Groom) लग्नात आलेल्या पाहुण्यांना (Wedding Guests) किचनमधील भांडी घासायला लावली. अर्थात ही परिस्थिती सर्व पाहुण्यांना अनपेक्षित होती. यूजरने सांगितल्यानुसार नवरी तब्बल 10 महिलांना घेऊन किचनमध्ये गेली आणि तिथे पाहुण्यांकडून प्लेस्ट स्वच्छ करायला सांगितलं, (The guests were made to wash the utensils ) हे ऐकून नटून थटून आलेल्या सर्व महिलांना जबर धक्काच बसला.

पाहुण्यांना जेवण पडलं कमी

किचनमध्ये खूप उष्णता होती. मात्र तरीही महिला रिसेप्शन सोडून किचनमध्ये भांडी घासत बसल्या होत्या. मात्र ही घटना इथपर्यंतच थांबली नाही. तर लग्नात अनेक पाहुण्यांना जेवणच मिळालं नाही. ही स्टोरी पोस्ट करणाऱ्या महिलेच्या पतीला लग्नात जेवण मिळालं नाही. लग्नाची ही घटना खरंच खूप विचित्र होती.

(हे ही वाचा-6 फेऱ्यानंतर नवरीचा लग्नास नकार; नवरदेवाच्या कुटुंबीयांनी केली अजब मागणी)

या नवदाम्पत्याने आपल्या लग्नात सेल्फ कॅटरिंगचा (Self Catering) पर्याय निवडला होता. या पर्यायानुसार लग्नात जेवणानंतर भांडी घासण्याचं काम वर-वधु पक्षाकडून केलं जातं. त्यामुळे कडकीत असलेल्या नव दाम्पत्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडूनच भांडी घासून घेतली. अन्यथा दाम्पत्याला डिपॉजिट केलेले पैसे (Deposit Money) परत दिले जात नाही. दाम्पत्य (Couple) लग्नात आलेल्या पाहुण्यांना म्हणाले की, ते आर्थिक चणचणीत जात आहेत आणि त्यामुळे वेटर्स किंवा दुसरी मदत (जेवणानंतर भांडी घासणे, स्वच्छता वगैरे) घेऊ शकलो नाही.

First published:

Tags: Marriage, Viral news