जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Breast Sagging : सैल ब्रेस्ट काही दिवसांतच होतील टाईट; करा हे साधे आणि सोपे उपाय

Breast Sagging : सैल ब्रेस्ट काही दिवसांतच होतील टाईट; करा हे साधे आणि सोपे उपाय

Breast Sagging : सैल ब्रेस्ट काही दिवसांतच होतील टाईट; करा हे साधे आणि सोपे उपाय

महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि चिंताजनक बदल असतो म्हणजे ब्रेस्टमधील बदल. काही महिलांचे ब्रेस्ट सैल होतात आणि काहीवेळा लटकल्यासारखे दिसतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 नोव्हेंबर : महिलांचे आपल्या शरीराकडे विशेष लक्ष असते. शरीरातील अगदी छोटे छोटे बदलही महिलांच्या नजरेतून सुटत नाहीत. महिलांच्या शरीरात वाढत्या वयानुसार खूप बदल होत जातात. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर काही बदल होतात. त्यानंतर गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीनंतर आणि त्यानंतर मेनोपॉज. अशा अनेक गोष्टीनंतर महिलांच्या शरीरात खूप बदल होत असतात. मात्र या काही ठराविक कारणांऐवजीही अनेकदा महिलांच्या शरीरात बदल होतात. महिलांसाठी सर्वात महत्वाचा आणि चिंताजनक बदल असतो म्हणजे ब्रेस्टमधील बदल. काही महिलांची ब्रेस्ट सैल होते आणि काहीवेळा लटकल्यासारखे दिसते. हा बदल कोणत्याही महिलेला आवडण्यासारखा नाही. कारणं काहीही असो, पण या सैल ब्रेस्टवर उपचार आवश्यक असतात. आज आम्ही तुम्हाला काही सैल ब्रेस्ट टाईट करण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय सांगत आहोत.

Weight Loss By Tea : रोज चहा पिऊन या डॉक्टरने घटवलं 30 किलो वजन, तेही 18 महिन्यात

सैल स्तनाची कारणे - स्तन मोठ्या आकाराचे असणे - रजोनिवृत्तीमध्ये हार्मोनल चेंजेस होणे - वजन कमी होणे - इस्ट्रोजेनची कमतरता - धुम्रपानाचा त्वचेवर परिणाम - लठ्ठपणा - गर्भधारणा - स्तनाचा कर्करोग - फास्ट एक्सरसाइज

News18लोकमत
News18लोकमत

सैल स्तनासाठी करा हे उपाय सैल स्तनांसाठी तेल मालिश हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी ब्रेस्टची मालिश केली जाते. तेल मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्तनांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. मसाजमुळे ब्रेस्टशी संबंधित इतर आजारांचा धोका दूर होतो. ब्रेस्ट मसाज नवीन पेशी वाढीसाठी उत्तेजक म्हणून काम करते. या मसाजमुळे तणाव आणि चिंता दूर होते. तसेच स्तनामध्ये फायब्रॉइड्स तयार होण्यास प्रतिबंध करते. ब्रेस्टला सपोर्टिव्ह अशी ब्रा घाला ब्रेस्टच्या हेल्थसाठी आणि आकार बोघडु नये म्हणून अशी ब्रा निवडणे आवश्यक आहे जी सहाय्यक म्हणजेच ब्रेस्टला सपोर्टिव्ह असेल आणि जास्तीत जास्त कव्हरेज देईल. तुमची ब्रा योग्यरित्या निवडल्यास ब्रेस्टचा आकार बदलत नाही. नियमित व्यायाम अनेक योगासने आहेत, तसेच इतर प्रकारचे व्यायाम आहेत जे तुमचे स्तन टोन आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात. तुमचे स्तन चांगल्या आकारात येण्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल बसण्याची योग्य पद्धत व्यायामाप्रमाणे आपल्या बसण्याच्या पद्धतीचाही आपल्या स्तनांच्या आकारावर परिणाम होतो. खुर्चीत बस्तान योग्य बसने म्हणजेच ताठ बसने आवश्यक आहे. तुम्ही तासंतास पाठीतून वाकून म्हणजेच कुब्बड काढून बसत असाल तर हेदेखीले तुमची ब्रेस्ट सैल होण्यास कारणीभूत ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात