मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा 'Breast Feeding'

बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा 'Breast Feeding'

Breast Feeding Week 2021: पहिल्यांदाच मातृत्व अनुभवताय आणि बाळाला दूध (Breast Feeding) कसं पाजायचं कळत नाही, तर ही माहिती नक्की वाचा.

Breast Feeding Week 2021: पहिल्यांदाच मातृत्व अनुभवताय आणि बाळाला दूध (Breast Feeding) कसं पाजायचं कळत नाही, तर ही माहिती नक्की वाचा.

Breast Feeding Week 2021: पहिल्यांदाच मातृत्व अनुभवताय आणि बाळाला दूध (Breast Feeding) कसं पाजायचं कळत नाही, तर ही माहिती नक्की वाचा.

नवी दिल्ली,02 ऑगस्ट : मातृत्वाचा सुखद अनुभव पहिल्यांदा घेताना प्रत्येक महिलेला मदतीची गरज असते. नवजात बाळाला सांभाळण्याचा कोणताही अनुभव (Experience) आईला नसतो. बाळाला कसं हाताळावं, स्तनपान (Breast Feeding) कसं करावं यादंर्भात अनेक शंका मनात असतात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा मुख्य आहार (Staple diet) हे आईचं दूध (Mother's milk) असतं. आईचं दूध पचायला हलकं (Easy to digest) आणि तितकचं पोषक (Healthy) असतं. स्तनपान हे बाळाच्या निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी (For a Healthy Life) महत्त्वाचं असतं. जन्माल्यानंतर बाळ पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. बाळाची काळजी घेण्याबरोबर स्तनापान करतानाही विषेश लक्ष द्यावं लागतं. पहिले 6 महिने बाळाला केवळ आईचं स्तनपान योग्य मानलं जातं. पण, आईला लहानग्यांना सांभाळण्याचा कोणताही अनुभव नसतो. ज्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात.

बाळाला दूध पाजताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आईला नसते. बाळाला कोणत्या प्रकारे स्तनापान करावं. याची योग्य माहिती जाणून घेऊयात.

(तुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack)

स्तनपान कस कराव?

बाळाला दूध पाजताना बाळाचं डोकं आईच्या छातीपेक्षा जास्त वर असावं. म्हणजे सुमारे 45 अंशांच्या कोनात राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्यतो बाळाला थोडं बसवून स्तनपान करणं चांगलं. यासाठी बाळाची मान आपल्या हात धरा किंवा आधार द्या.

झोपून स्तनपान करू नका

अनेक स्त्रिया बाळाला झोपून स्तनपान करतात. हा अतिशय चुकीचा पर्याय आहे.  बाळाला झोपवून कधीही स्तनपान करू नका. यामुळे मुलाला कानाच्या इनफेक्शनचा धोका होतो.

(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...)

लगेच झोपवू नका

बऱ्याच वेळा बाळाला दूध पाजल्यावर लगेचच बेडवर ठेवलं जातं. पण हे बाळासाठी चांगलं नाही. बाळाला दूध प्याजल्यानंतर लगेच अंथरुणावर किंवा मांडीवर झोपू देऊ नका. यामुळे बाळाला दूध पचणार नाही किंवा त्याला उलटी होईल.

खांद्यावर घेऊन पाठ थोपटा

बाळ दूध प्यायल्यावर त्याला खांद्यावर घ्या आणि त्याची पाठण हलकेच चोळा. यामुळे प्यायलेलं दूध घशात राहणार नाही. स्तनपान करताना पोटात गेलेली हवा बाहेर येईल.

(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)

ढेकर काढा

काही लोक बाळाला स्तनपानानंतर लगेच झोपवतात. त्यामुळे प्यायलेलं दूध श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता असतं. त्यामुळेच बाळाला झोपेतही उलटी होऊ शकते. त्यामुळे ढेकर काढा. बाळ थोडं मोठं असेल तर, त्याला बसवून ढेकर काढा.

(पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा)

ब्रेस्ट पंप वापरा

बऱ्याच वेळा असं होतं की काही कारणामुळे आई बाळाला स्तनपान करू शकत नाही किंवा मूल व्यवस्थित स्तनपान करू शकत नाही. अशा परिस्थितीत मुलाला बाहेरचं दूध द्यावं लागतं. बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध खुप महत्वाचं आहे. त्यामुळे बाहेरचं दूध देण्यापेक्षा ब्रेस्ट पंपची मदत घेऊ शकता.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mother, Small baby