हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणं आहेत. अमेरिकेतील NCBI या संस्थेच्या रिपोर्टनुसार 11% लोकांना हार्ट टॅक बाथरूममध्ये येतो.
2/ 7
तज्ज्ञांच्या मते ज्यांना आधीपासूनच हृदयाशी संबंधीत आजार आहे त्यांना हा धोका जास्त असतो.
3/ 7
अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच बाथरूमध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी अंगावर गार पाणी घेताना त्याच्या तापमानाचा विचार करायला हवा.
4/ 7
डॉक्टरांच्या मते वातावरणानुसार अंघोळीसाठी पाणी वापरावं. म्हणजे थंडीत जास्त थंड पाणी वापरू नये तर, उन्हाळ्यात जास्त गरम पाणी वापरू नये.
5/ 7
बरेच लोक अंघोळ करताना जास्त जोरात हालचाल करतात. त्यामुळे स्ट्रेस वाढून स्ट्रोक किंवा अटॅकचा धोका वाढतो.
6/ 7
याशिवाय ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे आणि हृदय विकारही आहेत अशा लोकांनी शौचाला जास्त जोर लावू नये. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो.