मुंबई, 9 जानेवारी : स्ट्रोक ही एक अशी न्यूरोलॉजिकल समस्या आहे जिला आपण ब्रेन अटॅक म्हणून देखील ओळखतो. बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा रक्तप्रवाहात अडथळा आल्याने रक्तवाहिन्या फुटतात तेव्हा ब्रेन स्ट्रोकची समस्या होते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात याचा त्रास अनेक पटींनी वाढू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. एका संशोधनानुसार अमेरिकेत दरवर्षी सुमारे 8 लाख लोक स्ट्रोकला बळी पडतातआणि भारतात दर एक लाख लोकांमागे सुमारे 150 लोकांना याचा त्रास होतो. मेंदूतील रक्ताभिसरणाच्या प्रवाहामुळे ऊती आणि पेशींचे मोठे नुकसान होते. एक्सप्रेसच्या बातमीनुसार, मेंदूचे वेगवेगळे भाग शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर नियंत्रण ठेवतात आणि रक्तप्रवाह थांबल्याने त्या त्या भागांवर याचा परिणाम होतो.
वाढते यूरिक अॅसिड किडनी करू शकते डॅमेज, या पदार्थांनी करू शकता कंट्रोलब्रेन स्टोकचे प्रकार ब्रेन स्ट्रोकचे साधारणपणे तीन प्रकार असतात. यात इस्केमिक स्ट्रोक, इंट्रासेरेब्रल ब्रेन स्ट्रोक, सबराचोनॉइट ब्रेन स्ट्रोक या प्रकारांचा समावेश असतो. याशिवाय मिनी स्ट्रोक देखील एक प्रकार असतो. स्ट्रोकची लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याइतकी वेदनादायक नसतात किंवा त्यांची कोणतीही गंभीर लक्षणे नसतात. पण वेळीच काळजी घेतली नाही तर आयुष्यासाठी मोठी समस्या बनू शकते. परंतु काही लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्यावा. कोणती आहेत ते लक्षणे जाणून घेऊया.
स्ट्रोकची लक्षणे - चेहरा, हात किंवा पाय अचानक अचानक सुन्न होणे किंवा अशक्त होणे. - बोलण्यात अडचण येणे किंवा एखाद्याचे बोलणे समजण्यात अडचण येणे. - डोळ्यांवर ताण येणे, दिसण्यात अचानक अडचण येणे. - चालण्यात अडचण येणे, शरीराचे संतुलन राखण्यात अडचण येणे. - अचानक तीव्र डोकेदुखीची समस्या होणे. - अचानक चक्कर येणे. स्ट्रोकच्या समस्येची कारणे - स्ट्रोकसाठी तणाव हा सर्वात मोठा जोखीम घटक आहे. - अति थंडीमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. - धुम्रपान, दारूचे सेवन यामुळेही ब्रेन स्ट्रोक होतो. - मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे देखील स्ट्रोक येतो. - अतिरिक्त लठ्ठपणामुळे ब्रेन स्ट्रोकची समस्याही वाढते.
Winter Heart attack : 5 दिवसांतच शेकडो बळी; हिवाळ्यात तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका किती पाहा(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)