नवी दिल्ली, 09 जानेवारी : थंडी वाढली तसे हार्ट अटॅक ची प्रकरणंही वाढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये तर फक्त 5 दिवसांत हार्ट अटॅकमुळे शेकडो बळी गेले आहेत. तर काही जण जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत. हिवाळ्याती ल हार्ट अटॅकची ही प्रकरणं पाहून प्रत्येकाच्या काळजात धस्सं झालं आहे. हिवाळ्यात हार्ट अटॅक का येतो? यामागील कारणं काय? लक्षणं काय? थंडीत हार्ट अटॅक नेमका कुणाला येतो? मलाही हार्ट अटॅकचा धोका तर नाही ना? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असली. हिवाळ्यातील हार्ट अटॅकबाबत सविस्तर माहिती तुमच्यासाठी. हिवाळ्यात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्याची बरीच कारणं आहे. पर्यावरणीय कारणांपासून ते आपल्या जीवनशैलीपर्यंत सर्वांचा यात समावेश आहे. या सर्व कारणांबाबत शालीमार बाग इथल्या फोर्टिस रुग्णालयातले प्रसिद्ध इंटरव्हेन्शल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्याची कारणे हिवाळ्यात तापमानात घट - हिवाळ्यात तापमानात घट झाल्यानं शरीर संतुलन बिघडतं. यामुळे शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो. जेव्हा शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो आणि भीती निर्माण होते तेव्हा कॅटेकोलामाइन्स शरीराला अशा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करतात. अॅड्रिनल ग्रंथी तणावाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅटेकोलामाइन्स तयार करतात. जेव्हा शरीरात कॅटेकोलामाइन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि श्वासाची गती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम वाढते. वायूप्रदूषण - वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. परंतु, त्यामुळे हृदयविकारही होऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार, वायुप्रदूषणामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. यामुळे काही जणांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते. आहार आणि शिथिलता - हिवाळ्यात अनेकांचा आहार अचानक वाढतो. दिवस लहान असल्यानं लोक फिरणं टाळतात. व्यायामाचं प्रमाण कमी होतं. एकूणच शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढू लागतं. काही जणांचं वजनदेखील वाढू लागतं. उन्हाळ्यात शारीरिक हालचालींमुळे घाम येतो आणि घामाद्वारे सोडियम, तसंच पाणी बाहेर पडतं. हिवाळ्यात शारीरिक हालचाली पुरेशा प्रमाणात न झाल्यानं सोडियम बाहेर टाकलं जात नाही. त्यामुळे पेरिफेरल रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. परिणामी हृदयावरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकची जोखीमदेखील वाढते. हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं 1) शरीराचं योग्य तापमान राखणं ही आव्हानात्मक बाब आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणामध्ये तर ते अधिक कठीण ठरतं. शरीरातील उष्णता कमी होण्याच्या वेगामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. 2) थंडीमुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. परिणामी ब्लड प्रेशर वाढतं. हार्ट अॅटॅक आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. 3) हायपरटेन्सिव्ह समस्या असलेल्या बहुतेक व्यक्तींना हिवाळ्यात रक्त घट्ट होणं, रक्ताच्या गुठळ्या होणं आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होणं, अशा अडचणी जाणवू लागतात. या सर्वांमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. 4) हिवाळ्यात धुकं आणि इतर प्रदूषकं वातावरणाच्या जमिनीच्या जवळील थरात स्थिरावतात. त्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या आणि छातीत संसर्ग होण्याची शक्यता असते. 5) हिवाळ्यातील कमी तापमानामुळे तुम्हाला घाम येणं कमी होतं. जर तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाणी योग्य प्रमाणात बाहेर पडत नसेल, तर त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊ शकतं. याचा हृदयाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात या व्यक्तींना असतो हार्ट अॅटॅकचा धोका 1) ज्यांना हृदयविकार आहे, म्हणजेच पूर्वी हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक आला आहे त्यांना हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी हिवाळ्यात अधिक सतर्क राहिलं पाहिजे. 2) ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनादेखील हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते. 3) याशिवाय हायपरटेन्शनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीदेखील हिवाळ्यात काळजी घेणं आवश्यक आहे. 4) ज्येष्ठ नागरिकांनाही हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनीदेखील पुरेशी काळजी घ्यावी. हिवाळ्यातील हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावं? 1) सर्वप्रथम थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. थंडी असताना घराबाहेर पडणं टाळावं. अत्यावश्यक असेल तर उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडावं. 2) हिवाळा आहे, दिवस लहान आहे म्हणून शारीरिक हालचालीमर्यादित ठेवू नयेत. नियमित पुरेसा व्यायाम करावा. 3) हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामुळे खाण्यावर स्वयंनियंत्रण आवश्यक आहे. आहार मर्यादित ठेवावा. थोड्या थोड्या वेळानं थोडं खावं. 4) जो आहार घ्याल, त्यात कोलेस्टेरॉल वाढवणारे पदार्थ नसावेत. तूप, तेलाचा कमी वापर करावा. तूप शरीरातलं तापमान कायम राखण्यास मदत करतं, असं सांगितलं जातं. परंतु, तुपामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. त्यामुळे तुपाचं सेवन टाळावं. 5) ड्रायफ्रूट्सचं सेवनही मर्यादित प्रमाणात करावं.
- हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर खाव्यात. हंगामी भाजीपाला आणि फळं खावीत. 7) हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्यावीत. 8) धूळ, धूर आणि प्रदूषणापासून शक्यतो दूर राहावं. घरातून बाहेर पडताना मास्क लावावा. 9) शरीर हायड्रेटेड ठेवावं. 10) ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हल नियमित तपासावी. 11) हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.