मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना लस घेतल्यानंतर आजारी पडला; आता सरकार देणार 1 कोटी 23 लाख रुपये

कोरोना लस घेतल्यानंतर आजारी पडला; आता सरकार देणार 1 कोटी 23 लाख रुपये

लसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत

लसीकरणानंतर दुष्परिणाम झालेल्यांना सरकारी मदत

कोरोना लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्यास सरकारकडून मदत.

  • Published by:  Priya Lad
सिंगापूर, 18 ऑगस्ट : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर ताप येणं, हात दुखणं, डोकं जड होणं अशा किरकोळ समस्या बहुतेकांना जाणवत आहेत. पण काहींना गंभीर समस्याही उद्भवत आहेत (Side effect of corona vaccine). कोरोना लसीकरणानंतर गंभीर समस्या उद्भवणाऱ्या अशा लोकांसाठी सिंगापूर (Singapore) सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत देऊ केली आहे. सिंगापूरमध्ये 16 वर्षीय मुलाला कोरोना लस (Corona vaccination) घेतल्यानंतर हार्ट अटॅक (Heart attack) आला. त्याने फायझरची कोरोना लस (Pfizer Vaccine) घेतली होती. लसीकरणानंतर सहा दिवसांत त्याला हृदयविकाराचा झटका आला. पण यामुळे तो करोडपती बनेल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. सिंगापूर सरकार आता या मुलाला आर्थिक मदत म्हणून 2 लाख 25 हजार सिंगापूर डॉलर्स म्हणजे जवळपास 1 कोटी 23 लाख रुपये देणार आहे. आरोग्य मंत्रायलाने पत्रकार ही घोषणा केली. सिंगापूर वॅक्सिन इंज्युरी फायन्साशिअल असिस्टेंस प्रोग्राम (VIFAP)  अंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. हे वाचा - धक्कादायक! चीनने खाण्यासाठी विकली कोरोना संक्रमित जनावरं; रिपोर्टमधून पोलखोल ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्या मायोकार्डिटिस (myocarditis) झाला ज्यामुळे त्याला हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं. कोरोना लशीमुळे ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कॅफिनेयुक्त पेयाचं सेवन किंवा जड वजन उचलल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. मायोकार्डिटीज  हे व्हायरस इन्फेक्शन आहे. यामुळे हृदय कमजोर होऊ शकतं आणि हार्ट येऊन मृत्यूचा धोकाही असतो. छातीत वेदना आणि श्वास घेताना त्रास ही याची सामान्य लक्षणं आहेत. हे वाचा - कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड दरम्यान या मुलाची प्रकृती आता सुधारली आहे. तो आपली दैनंदिन काम करू शकतो, असंही मंत्रालयाने सांगितलं आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Singapore

पुढील बातम्या