नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: एकीकडे जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pandemic) वाढत असला, तर जगात असे अनेक लोकं आहेत, ज्यांना कोरोना लशीवर अद्याप विश्वास नाही. कोरोना लशीच्या परिणामामुळे अनेकजण अजूनही लस घेण्यास कचरत (Not Ready to Take Corona Vaccine) आहेत. अशातच कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका (Risk of paralysis) असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून (Lancet Research) समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा लस लाभार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पण यातही सकारात्मक बातमी म्हणजे, कोरोना लशीच्या तोट्यांपेक्षा त्याचे फायदे अधिक असल्याचंही संबंधित संशोधनात म्हटलं आहे.
द लॅन्सेट इनफेक्षियस डिसीजेस जर्नल या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, चीननं तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या लशीचे फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत, पण काही रुग्णांत चेहऱ्याचा पक्षाघात झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पण एक लाख रुग्णांमागे 4.8 लोकांना या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असल्याचं हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज
खरंतर, कोरोनाव्हॅक ही निष्क्रिय विषाणूपासून तयार केलेली लस आहे. याचाच परिणाम म्हणून लस लाभार्थ्याच्या चेहऱ्याच्या एका भागाला बेल्स पाल्सी या दुर्मिळ चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका आहे. पण या आजाराची लक्षणं सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात. त्यासाठी कोणताही उपचार करावा लागत नाही, असंही या संशोधनात सांगण्यात आलं आहे. चीनच्या कोरोनाव्हॅक आणि फायझर या दोन लशींच्या दुष्परिणांमाबाबत हाँगकाँग विद्यापीठात अभ्यास करण्यात आला असून त्यात लशीचा डोस घेतल्यानंतर पहिल्या 42 दिवसांत बेल्स पाल्सीची लक्षणं किती जणात दिसली याची याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.
हेही वाचा-Delta Variant ची दहशत! एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण देश लॉकडाऊन
संबंधित अभ्यासानुसार, कोरोनाव्हॅक लस घेतलेल्या 4 लाख 51 हजार 939 लाभार्थ्यांमध्ये केवळ 28 जणांमध्ये बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजाराची लक्षणं दिसली आहेत. तर फायझर कंपनीची BNT162B2 ही लस घेतलेल्या 5 लाख 37 हजार 205 जणांमध्ये 16 जणांना बेल्स पाल्सी या चेहऱ्याच्या पक्षाघाताची लक्षणं आढळली आहेत. फायझर बायोएनटेक आणि मॉडर्ना लशीमध्ये अशाप्रकारची लक्षणं दिसली नसल्याचा दावा, अमेरिकेच्या औषध प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण युरोपीय वैद्यकीय संस्थेने मात्र संबंधित दोन लशींमध्येही अशाप्रकारची लक्षणं दिसून आल्याचं म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Side effects