Home /News /lifestyle /

कुछ तो गडबड है दया! बॉलिवूड सेलिब्रिटींचे मालदीवमधील फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण

कुछ तो गडबड है दया! बॉलिवूड सेलिब्रिटींचे मालदीवमधील फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण

कोरोनाच्या महासाथीत बहुतेक सेलिब्रिटीज मालदीवमध्ये (maldives) सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

    मुंबई, 26 नोव्हेंबर : सध्या कोविड 19 च्या साथीमुळे बॉलिवूडही शांत असल्यानं बहुतांश सेलेब्रिटीज सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालदीवमध्येच गेले असल्याचं दिसत आहे. यामध्ये तापसी पन्नू, नेहा धुपिया ते बॅडमिंटनपटू  सायना नेहवालपर्यंत अनेक सेलिब्रिटीजचा समावेश आहे. सोशल मीडियावर या सर्व सेलेब्रिटीजचे मालदीवमधील असंख्य फोटो दिसत आहेत. खाली निळाशार समुद्र आणि वर निळं आभाळ अशा रमणीय ठिकाणी हे कलाकार सुट्टी आनंदात घालवत आहेत. या जागतिक साथीच्या काळात सरकार लोकांना घरी राहा असे सांगत असताना हे कलाकार मात्र मालदीवला जाऊन मजा करत आहेत. हे नेटिझन्सच्या नजरेतून कसं सुटेल. अख्खं जग आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. सध्याचा काळ आनंद साजरा करण्यासारखा नाही, अशा स्थितीत हे कलाकार मजा करत आहेत, यावर टीकाही होत आहे. बॉलिवूड मजा करण्यात मग्न आहे, तर घरी अडकलेले नेटीझन्स मालदीवमधील क्षणाक्षणाचे फोटो टाकणाऱ्या कलाकारांवर मिम्स बनवून मजा घेत आहेत. उपहासात्मक मिम्ससाठी प्रसिद्ध असणारा कॉमेडियन दानिश सैत याने मालदीवमध्ये मजा करत असलेल्या श्रीमंत माणसांमधील काल्पनिक संभाषणाचा एक व्हिडिओ बनवला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हे वाचा - सोशल मीडियावर अभिनेत्री झाली TOPLESS; फोटो पाहताच चाहते म्हणाले Pls don't delete एका नेटकऱ्यानं मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड स्टार्सच्या गर्दीवर, विमानाच्या दाराला लटकून जाणाऱ्या लोकांचा फोटो टाकला आहे. एकानं लोकलच्या गर्दीचा फोटो टाकून मालदीवला जाणारे स्टार्स, असं म्हटलं आहे. तर एकानं रेल्वेस्थानकावरील गर्दीचा फोटो टाकून भारतीय सेलेब्रिटीजची मालदीवला जाण्यासाठी गर्दी असं म्हटलं आहे. एकाने ब्रेकिंग न्यूज म्हणत, मालदीव आपलं नाव बदलून वांद्रे करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. तर एकानं एनसीबी, ईडी, सीबीआय कार्यरत झाल्यानं अवघं बॉलिवूड मालदीवला धावल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - अंकिताचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक डान्स, VIDEO पाहून सुशांतच्या चाहत्यांची टीका एकाने सोनीवरील सीआयडी मालिकेतील फोटोसह त्यातील एसीपी प्रद्युम्न यांचा प्रसिद्ध डायलॉग ‘कुछ तो गडबड है दया’ टाकला आहे. एकाने ही गर्दी बघून मलाही मालदीवला जावेसे वाटत आहे पण माझी गरीबी...जीवन जे आखरी दिन तक रहुंगा आपके साथ असे म्हटले आहे. सेलेब्रिटीजचे हे फोटो पाहून आपल्यालाही मालदीवला जाण्याची इच्छा होत असेल पण घर आणि सुरक्षित अंतर राखणे हेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood, Maldivs

    पुढील बातम्या