

आशा नेगी सध्या तरी आपल्या व्हेकेशन मोडचा आनंद घेत आहे आणि नुकतंच तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोनं सोशल मीडियावर आग लावली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट असलेला हा फोटो तिने आरशात पाहून काढलेला आहे. ज्यात तिनं पांढऱ्या रंगाच्या चादरीमध्ये स्वतःला लपेटून घेतलं आहे. हा फोटो तिने शेअर करताच तो इन्स्टाग्रामवर अधिकच व्हायरल झाला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


हा फोटो आहे की स्केच अशी कमेंट ॲथलिट आणि फिटनेस गुरु रितेश शैवाल संभ्रमात चाहते आहेत. हा फोटो शेअर करताना तिनं लवकरच हा फोटो डिलीट करेन असं म्हटलं आहे. मात्र चाहत्यांना हा फोटो इतका आवडला आहे की त्यांनी कृपया हा फोटो डिलीट करू नका, अशी विनंती केली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


आशा सध्यातरी हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. गेल्या आठवड्यात तिनं एका पोस्टद्वारे ती हिमाचल प्रदेशात आपल्या सुट्टीचा आनंद घेत असल्याचे सांगितलं होतं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


आशा याआधी अनुराग बासूच्या मल्टीस्टारर नेटफ्लिक्स ओरिजनल मुव्ही लुडोमध्ये दिसली होती. या चित्रपटाला चाहत्यांकडून खूपच प्रतिसाद मिळाला होता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


गेल्याच महिन्यात आशानं ZEE5 च्या अभय 2 वेब सिरीजचं शूटिंग पूर्ण केलं. ज्यात तिनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तसंच या वेबसीरीजमध्ये अभिनेता कुणाल खेमू हा मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)