मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कशी वाढवाल लैंगिक शक्ती? अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवलाने शेअर केला स्वतःचा VIDEO

कशी वाढवाल लैंगिक शक्ती? अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवलाने शेअर केला स्वतःचा VIDEO

अ‍ॅक्शन (Action) आणि फिटनेससाठी (Fitness) ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सेक्शुअल हेल्थबाबतही (sexual health) मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

अ‍ॅक्शन (Action) आणि फिटनेससाठी (Fitness) ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सेक्शुअल हेल्थबाबतही (sexual health) मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

अ‍ॅक्शन (Action) आणि फिटनेससाठी (Fitness) ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सेक्शुअल हेल्थबाबतही (sexual health) मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

मुंबई, 02 जून : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) त्याच्या अ‍ॅक्शन (Action) आणि फिटनेससाठी (Fitness) ओळखला जातो. आपले एक्सरसाइजचे बरे व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता तो सेक्शुअल हेल्थबाबतही (sexual health) मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. आपल्या सोशल मीडियावर त्याने सेक्शुअल हेल्थबाबतही काही टीप्स दिल्या आहेत. विद्युतने लैंगिक समस्येला सामोरं जात असलेल्या पुरुषांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने यावर उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतः हा उपाय करून दाखवला आहे. विद्युतने Erectile Dysfunction बद्दल सांगितलं आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी 19 एक्सरसाईझ सांगितल्या आहेत.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विद्युतनं लिहिलं आहे, "10 पैकी एका पुरुषाला याचा त्रास आहे. अशा पुरुषांसाठी मी इथं KalariSutraचे 19 एक्सरसाईझ सांगतो आहे. तुम्ही रोज हे एक्सरसाईझ करून शरीरातील ब्लड फ्लो नियमित करू शकता आणि सेक्शुअल एनर्जी मिळवू शकता. निरोगी राहण्यासाठी सेक्शुअल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. आपल्या समाजात याला एक टॅबू मानलं जातं. मात्र, आपल्याला याबाबत मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे" हे वाचा - प्रिया प्रकाशच्या Topless अवताराने चाहते Bold; पहिल्यांदाच शेअर केले PHOTO विद्युत त्याच्या स्टंटमुळे चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या चित्रपटातील स्टंट स्वतःच करण्यावर त्याचा भर असतो. त्याने आतापर्यंत अनेक अॅक्शनपट केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या (Top marshal artist) यादीत विद्युतचं नाव आलं आहे. विद्युतनेच याबाबत सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती. जेव्हा तुम्ही गुगलवर माझं नाव सर्च कराल तेव्हा तुम्हाला माझ्या नावासमोर सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट लिहिलेलं दिसेल, असं विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं. विद्युतच्या या कामगिरीने त्याच्याच नव्हे तर देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हे वाचा - असे Breast नको गं बाई! आपल्या स्तनांना वैतागली महिला कारण... या कामगिरीनंतर विद्युतचे नाव जॅकी चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीव्हन सीगल, डोनी येन या जगभरातील दिग्गजांसोबत दिसणार आहे. ही कामगिरी करणारा विद्युत पहिला भारतीय अभिनेता आहे. विद्युतच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Entertainment, Fitness, Sex, Sexual health, Vidyut Jamwal

पुढील बातम्या