जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अंगाला सुटली खाज अन् निदान झालं या गंभीर आजाराचं; वेळेत उपचार झाल्याने वाचला महिलेचा जीव

अंगाला सुटली खाज अन् निदान झालं या गंभीर आजाराचं; वेळेत उपचार झाल्याने वाचला महिलेचा जीव

अंगाला सुटली खाज अन् निदान झालं या गंभीर आजाराचं; वेळेत उपचार झाल्याने वाचला महिलेचा जीव

एखादा आजार किंवा रोगाची लक्षणं शरीरावर दिसू लागतात. तेव्हाच त्यावर उपाय केला, तर पुढचा त्रास वाचतो. काही वेळेला ही लक्षणं साधी वाटत असली, तरी आजार गंभीर असू शकतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 नोव्हेंबर : मानवी शरीर हे मशीनप्रमाणे आहे. दिवस-रात्र ते सुरू असतं; मात्र एखाद्या वेळी छोटासा जरी बिघाड झाला, तरी संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसतात. एखादा आजार किंवा रोगाची लक्षणं शरीरावर दिसू लागतात. तेव्हाच त्यावर उपाय केला, तर पुढचा त्रास वाचतो. काही वेळेला ही लक्षणं साधी वाटत असली, तरी आजार गंभीर असू शकतो. एका ब्रिटिश महिलेच्या बाबतीत असंच काहीसं झालं. अनेक महिन्यांपासून अंगाला खाज सुटत असल्यानं तिनं डॉक्टरांना दाखवलं, तेव्हा तिला गंभीर आजार झाल्याचं निदान झालं. स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एरिन शॉ या 30 वर्षीय महिलेच्या अंगाला अनेक महिन्यांपासून खाज सुटत होती. सुरुवातीला तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामागे काही गंभीर कारण असेल असं तिला वाटलं नाही; मात्र तिच्या आजाराचं निदान वेळेत झालं नसतं, तर काही महिन्यांत तिचा मृत्यूही झाला असता.

    पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

    स्कॉटलंडमध्ये रेनफ्रेवशायरमध्ये राहणारी एरिन शॉ कुटुंबासोबत ग्लासगोमध्ये एका फेस्टिव्हलला गेली होती. त्याच वेळी तिला त्वचेवर तीव्र वेदना जाणवू लागल्या. कोणी चाकू खुपसल्याप्रमाणे या वेदना होत होत्या. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, लिम्फोमा नावाच्या गंभीर आजारामुळे तिची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्यामुळेच तिच्या अंगाला खाज सुटली होती. एरिन जास्त दिवस जगू शकणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    लिम्फोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे. या आजारामुळे एरिनला केमोथेरपीचे उपचार घ्यावे लागले. तिला सतत 5 दिवस 24 तास बॅग घेऊन राहावं लागलं. Beatson Cancer Centre मध्ये तिला 8 महिने उपचारांसाठी राहावं लागलं. 606 तासांची एक वेगळी केमोथेरपी तिने घेतली. या सर्व उपचारांच्या माध्यमातून तिने कर्करोगावर मात केली आणि मृत्यूला दूर पळवलं. आता तिने कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम करायला सुरुवात केलीय. ख्रिसमसचा सणही ती त्यांच्यासोबतच साजरा करते. डायबेटिस टाइप -1 आता तीन वर्षांसाठी रोखता येणार; औषधाला मंजुरी काही वेळा शरीरातले बदल आपल्या लक्षात येत नाहीत. काही वेळा माणसं त्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र तसं केल्याने आजारांचा धोका वाढतो. आपल्या आरोग्याकडे डोळसपणे व नियमितपणे लक्ष ठेवल्यास गंभीर आजारांवरही मात करता येऊ शकते. एरिन शॉ हिच्या अंगाला सुटलेली खाज ही साधी नसून कर्करोगाच्या एका लक्षणांपैकी आहे, हे तिला डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं. वेळेत उपचार घेतल्यामुळे ती लिम्फोमासारख्या गंभीर आजारालाही परतवून लावू शकली. अशा घटनांमध्ये लवकर आणि अचूक निदान सर्वांत महत्त्वाचं असतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात