मुंबई, 21 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. पोषक आहार आणि व्यायामाचा अभाव, बैठ्या स्वरुपाचं काम तसेच मानसिक ताणतणावामुळे हृदयविकार आणि डायबेटिस होण्याचं प्रमाण वाढत आहे. आजकाल अगदी कमी वयातच हे आजार होत आहेत. डायबेटिस हा गुंतागुंत निर्माण करणारा आजार मानला जातो. डायबेटिसचे निदान झाल्यावर हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित रुग्णाला आटोकाट प्रयत्न करावे लागतात. आज डायबेटिस नियंत्रणासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ही बातमी डायबेटिसच्या रुग्णांसाठी सकारात्मक आणि महत्त्वाची आहे. आता डायबेटिसचा धोका तीन वर्षापर्यंत रोखणं शक्य होणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एका खास औषधाला नुकतीच मंजुरी दिली आहे. हे औषध डायबेटिस टाइप -1 तीन वर्षांपर्यंत रोखू शकतं. अशाप्रकारचं हे जगातलं पहिलं औषध आहे. डायबेटिसच्या उपचारांमध्ये हे औषध महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. आता डायबेटिसचा धोका तीन वर्षांपर्यंत रोखता येणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टॅप्लिझुमॅब नावाच्या एका औषधाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या औषधाच्या माध्यमातून डायबेटिस टाइप -1 तीन वर्षापर्यंत रोखता येणार आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनदेखील या औषधाला मंजुरी देण्याच्या तयारीत असून, सध्या तिथं या औषधाच्या ट्रायल सुरू आहेत. हेही वाचा - Winter health: थंडीच्या दिवसात कानदुखी जास्त त्रास देते; कारणे आणि त्यावरील उपाय समजून घ्या डायबेटिस टाइप -1 हा एक ऑटोइम्युन आजार असून, तो सर्वसामान्यपणे लहानपणापासून होतो. ब्रिटनमध्ये 4 लाख तर अमेरिकेतील 12 लाखांहून अधिक लोक या आजाराचा सामना करत आहेत. आहार विस्कळीत झाला तर डायबेटिस टाइप-2 होतो. डायबेटिस टाइप -1 मुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल प्रमाणात ठेवण्याचं काम करणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींचे नुकसान होऊ लागतं. याचे दुष्परिणाम शरीरातील दुसऱ्या अवयवांवर दिसू लागतात. हे दुष्परिणाम रोखण्यासाठी रुग्णाला इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. डायबेटिस टाइप -1चा सामना करणाऱ्या 85 टक्के रुग्णांमध्ये या आजारामागे कौटुंबिक इतिहास हे कारण नसते. वारंवार तहान लागणं, युरिनला वारंवार जावं लागणं, वजन कमी होणं, लवकर थकवा जाणवणं ही डायबेटिस टाइप -1 ची प्रमुख लक्षणं असतात. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर प्रसंगी मृत्यूदेखील होऊ शकतो. दरम्यान, डायबेटिस टाइप -1 चा धोका तीन वर्षांसाठी रोखण्याकरिता टॅप्लिझुमॅब या नवीन औषधास नुकतीच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. डायबेटिस टाइप -1 च्या संशोधनासाठी फंडिंग करणारी संघटना जेडीआरएफनं याविषयी माहिती देणारं ट्विट केलं आहे. अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील पहिले असे औषध आहे, ज्याचा वापर डायबेटिस टाइप -1 ने ग्रस्त रुग्णांवर केला जाणार आहे. या औषधाच्या माध्यमातून हा आजार तीन वर्षांपर्यंत रोखता येऊ शकतो. आठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांच्या वापराकरिता या औषधास मंजुरी दिली गेली आहे. हेही वाचा - पोटदुखी, अपचनकडे दुर्लक्ष नको; Stomach Cancer असेल तर अशी लक्षणे बळावतात टॅप्लिझुमॅब हे औषध टेझील्ड या नावानं उपलब्ध आहे, असं डेली मेलनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे औषध कशाप्रकारे काम करेल ते आता जाणून घेऊया. डायबेटिस टाइप -1 ची पहिली स्टेज असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर वाढते पण शरीर इन्शुलिन बनवते. अशा रुग्णांना हे औषध दिले जाईल. हे औषध एकप्रकारे इम्युनोथेरपीप्रमाणे काम करेल आणि डायबेटिस मुळापासून नियंत्रणात ठेवण्याचे काम करेल. या औषधाच्या ट्रायल यशस्वी झाल्या आहेत आणि रुग्णांमध्ये औषधाचा परिणामदेखील दिसून येईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे औषध शरीरातील इन्शुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करण्यापासून रोखते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील वाढणारी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येईल. ‘या नव्या औषधाला मंजुरी देणं हे डायबेटिस टाइप-1 च्या उपचारांसाठी उचललेलं मोठं पाऊल आहे’, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रॅंसिस्कोशी निगडीत डायबेटिस सेंटरचे संचालक डॉ. मार्क एस. अँडरसन यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.