• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं याचा संबंध आहे? WHO चा नवा खुलासा

कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं याचा संबंध आहे? WHO चा नवा खुलासा

WHO ने याआधी कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. पण आता संस्थेच्या GACVS समितीने आपला नवा रिपोर्ट दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 एप्रिल : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर काही जणांना रक्ताच्या गुठळ्या (Blood clotting) होत असल्याची समस्या जाणवली. विशेषत: अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर ही समस्या उद्भवल्याचं दिसून आलं. त्यानंतर बहुतेक देशांनी ही लस देणं थांबवलं आहे. खरंच कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं यांचा एकमेकांशी काही संंबंध आहे का? असा प्रश्न निर्माण झाला. जागतिक आरोग्य संघटनेने  (World Health Organisation) याआधी ही लस सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. पण आता डब्ल्यूएचओच्या (WHO) च्या ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटी ऑन वॅक्सिनेशन सेफ्टीच्या (Global Advisory Committee on Vaccination Safety) समितीने आपलं स्टेटमेंट जारी केलं आहे. थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (Thrombosis with Thrombocytopenia Syndrome - TTS) हा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा दुर्मिळ असा प्रकार आहे. शरीरातील प्लेटलेट्स कमी असल्यास ही समस्या उद्भवते. कोविशिल्ड (Covishield) आणि वॅक्झेरिया (Vaxzeria) या लशी घेतल्यानंतर ही समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे, असं GACVS ने सांगितलं. हे वाचा - Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध? ज्या लशी घेतल्यानंतर ही समस्या उद्भवली आहे त्या अॅडनोव्हायरल लशी (adenoviral vaccines) आहे. फायझर, मॉडर्ना, बायोएनटेक, स्पुतनिक V  या mRNA लशींचा असा काहीही दुष्परिणाम दिसून आला नाही. टीटीएसची जैविक यंत्रणा अद्याप तपासली जात आहे. अॅडानोव्हायरस लशीशी याचा थेट संबंध आहे असं अद्याप तरी ठोसपणे सांगू शकत नाही, पण ते डावलूही शकत नाही. असं या समितीने सांगितल्याचं वृत्त CNBC ने दिलं आहे. अॅस्ट्ऱाझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या निर्माण झाली. तर नुकतंच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झालेल्या एका महिलेचाही मृत्यू झाला. त्यानंतर यूएस एफडीएने या लशीवर तात्पुरती बंदी घातली आहे. नव्या अहवालानुसार कोरोना लस घेतल्यानंतर  TTS  होणं याचं प्रमाण खूप कमी आहे. 2.5 लाखपैकी एक ते एक लाखपैकी एक इतक्या प्रमाणात टीटीएसची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. हे वाचा - Explained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस? Pfizer ने ठेवली ही अट दरम्यान स्थानिक संसर्गाची स्थिती, लसीकरण दिला जाणारा गट आणि पर्यायी लशीची उपलब्धता या सर्वांचा विचार करून देशांनी फायदे आणि दुष्परिणामांचं विश्लेषण करावं, असा सल्ला GACVS च्या समितीने दिला आहे. तसंच वय आणि लिंगानुसार लशीचा आणि टीटीएसचा काय संबंध आहे हे पडताळण्यासाठी सर्वसमावेशक असा अभ्यास करावं, अंही समितीने सांगितलं. तसंच लस घेतल्यानंतर 4 ते 20 दिवसांत त्या व्यक्तीला तीव्र, सातत्याने डोकेदुखी, ओटीपोटात वेदना, श्वास घ्यायला त्रा आणि इतर अशी गंभीर लक्षणं तर दिसत नाही ना यावर डॉक्टरांनी लक्ष ठेवावं, असंही या समितीने सांगितलं.
  Published by:Priya Lad
  First published: