Home /News /lifestyle /

संपूर्ण तारुण्य अंधारात गेलं; फक्त एका उपचारामुळे साठीच्या उंबरठ्यावर मिळाली विशीत गेलेली 'दृष्टी'

संपूर्ण तारुण्य अंधारात गेलं; फक्त एका उपचारामुळे साठीच्या उंबरठ्यावर मिळाली विशीत गेलेली 'दृष्टी'

कोणताही उपचार नसलेल्या डोळ्यांच्या या आनुवंशिक आजारावर यशस्वी उपचार शोधण्यात संशोधकांना यश मिळालं आहे.

ब्रिटन, 25 मे : जगभरातील अनेक सुंदर गोष्टी आपण डोळ्यांनी (Eyes) बघतो. निसर्गानं घडवलेले अनेक चमत्कार आपण पाहू शकतो. पण अनेकांच्या नशिबी हे सुख नसतं. वेगवेगळ्या कारणांनी दृष्टीहीन झालेले लोक या सगळ्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत. अंधत्व येण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. विज्ञानाच्या सहाय्यानं अंधत्व दूर करण्याचे अनेक उपचारही मानवानं शोधून काढले आहेत. तरीही काही आजार दुर्धर असतात. अशाच एका दुर्धर आजारावर जनुकीय उपचार पद्धतीनं (Gene Therapy) मात करणं शक्य झालं असून एका 58 वर्षांच्या व्यक्तीला तब्बल 40 वर्षांनतर हे जग पुन्हा बघता आलं आहे. यूकेतील 58 वर्षांच्या व्यक्तीला जवळजवळ 40 वर्षांपूर्वी रेटिनाइटिस पिग्मेन्टोसा (Retinitis pigmentosa) नावाचा न्यूरोडिजेनेरेटिव्ह प्रकारचा डोळ्यांचा आजार झाल्याचं निदान झालं होतं. आरपी (RP) म्हणूनही हा आजार ओळखला जातो.  यामध्ये डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रेटीनावर (Retina) परिणाम होतो आणि दृष्टी जाते. जनुकीय उपचार पद्धतीशिवाय यावर कोणताही उत्तम उपाय नाही. जनुकीय उपचार पद्धतीदेखील प्रत्येकावर यशस्वी ठरतं असं नाही. आता संशोधकांनी विकसित अशा जनुकीय थेरेपीने या व्यक्तीवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे त्याची दृष्टी परत आली आहे. हे वाचा - कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप डॉक्टरांनी या व्यक्तीवर जेनेरिक इंजिनीअरिंग (Generic Engineering) आणि लाईट अॅक्टीव्हेटेड (Light Activated) थेरेपीचा (Therapy) वापर केला. या उपचारपद्धतीत संशोधकांच्या पथकानं ऑप्टो जेनेटिक्सतंत्राचा वापर केला. यामुळे रेटीनामध्ये लाईट सेन्सिटीव्ह प्रोटीन्स (Light Sensitive Proteins) निर्माण करणाऱ्या पेशींना चालना दिली जाते. या उपचारात एका डोळ्यातील संसर्गावर मात करण्यात आली.  त्यामुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी काही प्रमाणात परत आली आहे. त्यानंतर संशोधकांनी कॅमेरा (Camera) असलेलं विशेष प्रकारचं गॉगल तयार केलं आहे. हे गॉगल्स वस्तूच्या प्रतिमा रेटीनावर प्रोजेक्ट करतात.  अनेक महिन्यांच्या या उपचारांनंतर आता ही व्यक्ती विशिष्ट प्रकारचे गॉगल्स (Goggles) वापरून वेगवेगळ्या वस्तू कुठे आहे ते पाहू शकते आणि त्यांना स्पर्श करू शकते, अशी माहिती यूके मेट्रोने दिली आहे. हे वाचा - ना कोणती लस, ना औषध! Whisky पिऊन लोकांनी महासाथीशी दिला लढा या यशामुळे आता ‘आरपी’ या आजारावरील उपचारांना नवी दिशा मिळाली असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. या रुग्णाला त्याच्या डोळ्यातील रेटीनावरील अनुवांशिकरित्या बदललेल्या (Genetically Altered) पेशी (Cells) स्थिर करण्यासाठी काही महिने विशिष्ट प्रशिक्षण घ्यावं लागलं, असंही संशोधक म्हणाले.
First published:

Tags: Eyes damage, Health, Serious diseases

पुढील बातम्या