मुंबई, 4 सप्टेंबर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने (Madhuri Dixit Husband) हे सर्वश्रुत आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवरुन डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) लोकांना आरोग्यविषयक सल्ले देत असतात. ते एक कार्डिॲक थोरेसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जन आहेत. नुकताच त्यांनी जीईआरडी, म्हणजेच गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लेक्स डिसीज (Shriram Nene Health tips) याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे, की जीईआरडी (GERD) झाल्यास आपल्या पोटातील अन्न पचवण्यासाठी असणारे असिड पोट आणि तोंडाला जोडणाऱ्या नलिकेमध्ये येते. यामुळे आपल्याला करपट ढेकरा येणं आणि ॲसिडिटी असे त्रास जाणवू लागतात. डॉ. नेनेंनी या व्हिडिओमध्ये जीईआरडी (Dr. Nene on GERD) कसा ओळखावा आणि त्यावर काय उपाय करावे याबाबत माहिती दिली आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
आपल्या देशामध्ये जवळपास 30 टक्के लोकांना जीईआरडीची (GERD problem) समस्या जाणवते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फरर्मेशन स्टडीने 2018 साली केलेल्या एका संशोधनामध्ये असं समोर आलं होतं, की जीईआरडीची समस्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होते. हे अर्थातच खरं आहे. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक विकार पाठीमागे लावून घेत आहोत. जीईआरडीची लक्षणं (Symptoms of GERD) आपण सहज ओळखू शकतो, आणि वेळीच त्यावर उपाय करुन ही समस्या आणखी गंभीर होणं टाळू शकतो. जेवणानंतर छातीत जळजळ (Burn in chest) होणं, तोंडात कडवटपणा किंवा आंबटपणा (Sour mouth) जाणवणं, तोंडाला दुर्गंधी (Mouth odour) येणं, मळमळ किंवा उलटी (Vomit) होणं, गिळताना त्रास होणं आणि गळ्यात खवखव होणं अशा काही लक्षणांचा यात समावेश आहे.
View this post on Instagram
तज्ज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा जीईआरडीची लक्षणं दिसत असतील, तर तिने त्वरित डॉक्टरांचा (Is GERD dangerous) सल्ला घ्यावा. जीईआरडीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या असोफॅगसला इजा पोहोचू शकते. यासोबतच, गंभीर स्वरुपाच्या जीईआरडीमुळे (GERD can cause Cancer ) दमा आणि कॅन्सरसारखे आजारही होण्याची भीती असते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकते.
हे ही वाचा-Heart Attack मुळे दररोज मरताहेत चारातले 3 लोक; धक्कादायक आकडेवारी आली समोर!
डॉ. नेनेंनी आपल्या व्हिडिओमध्ये जीईआरडीपासून (Dr. Nene Health tips) बचावासाठी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये सर्वात आधी ते सांगतात, की अगदी टाईट कपडे वापरणं आपण टाळायला हवं. यासोबतच, आपल्याला वारंवार (How to avoid acidity) हा त्रास जाणवत असेल, तर जेवणाचं प्रमाण कमी करण्याचा सल्लाही डॉ. नेने (Dr. Nene on Reflux Gerd) देतात. तसेच, जेवताना हळू हळू आणि नीट चावून खाणे गरजेचे आहे. दारू, तंबाखू आणि चॉकलेट (Tips to avoid sore burps) सारख्या गोष्टींचे प्रमाणाबाहेर सेवन करणं टाळायला हवं. शिवाय, जेवणानंतर कमीत कमी 30 मिनिटे तरी झोपू नये, असे काही सल्ले डॉ. नेने यांनी दिले आहेत.
या सल्लांचे पालन करुन तुम्ही असिडिटी आणि करपट ढेकरांपासून मुक्ती मिळवू शकता. तसेच, जीईआरडीचा धोकाही टाळू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Madhuri dixit